⁠
Inspirational

अमेरिकेची नोकरीची ऑफर सोडून घेतला UPSC ध्यास ; अनुकृती शर्मा झाली IPS अधिकारी !

UPSC IPS Success Story : आपले ध्येयनिश्चिती असेल तर आपल्याला तिथपर्यंत शिखर गाठता आले पाहिजे‌. हेच अनुकृती यांनी सिद्ध करून दाखविले आहे. अनुकृती यांचा जन्म राजस्थानमधील अजमेर येथे झाला. त्यांचे आई-वडील सरकारी नोकरीत होते. वडील संचालक होते आणि आई शिक्षिका आहे…या दोघांनी आयपीएस होण्यासाठी अनुकृती यांना आयपीएस होण्यासाठी नेहमी प्रोत्साहन दिले.

अनुकृतीचे शालेय शिक्षण हे जयपूरच्या इंडो भारत इंटरनॅशनल स्कूलमध्ये झाले. त्यानंतर तिने कोलकाता येथील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स एज्युकेशन अँड रिसर्चमध्ये जाऊन बीएसएमएसचे शिक्षण घेतले.टेक्सासमधील ह्युस्टन येथील राइस युनिव्हर्सिटीमध्ये पीएचडी कार्यक्रमासाठी निवड झाली होती. याच दरम्यान नासा सारख्या प्रसिद्ध संस्थेत नोकरीची संधी मिळत होती. पण ही संधी न घेता त्यांनी युपीएससी परीक्षेचा अभ्यास करण्याचा निर्णय घेतला.

त्यांनी खूप मेहनत करूनही पहिल्या प्रयत्नात यश मिळालं नाही, पण दुसऱ्या प्रयत्नात आयआरएस झाली. काहीतरी करून दाखवण्याचे स्वप्न अपूर्ण राहिले असले तरी तिसर्‍याच प्रयत्नात २०२० मध्ये त्या आयपीएस झाल्या. आयपीएस झाल्यावर त्यांनी पोलीस माय फ्रेंड या उपक्रमांतर्गत गावोगावी जाऊन जनजागृती करण्यास सुरुवात केली. यामध्ये गावातील लोकांना महिला आणि मुलींसोबत होणाऱ्या कौटुंबिक हिंसाचाराची जाणीव करून देऊन कौटुंबिक हिंसाचार कमी करण्यासाठी प्रयत्न केला.

Related Articles

Back to top button