⁠  ⁠

12वीत नापास, भिकारींमध्ये झोपले, शिपाई म्हणूनही काम केले, शेवटी UPSC क्रॅक करून IPS झाले..

Chetan Patil
By Chetan Patil 2 Min Read
2 Min Read

IPS अधिकारी मनोज कुमार शर्मा (IPS Manoj Kumar Sharma) हे नाव तर अनेकांनी ऐकलेच असेल. 12th Fail हा चित्रपट मनोज कुमार शर्मा यांच्या आयुष्यावर आधारित आहे. मुळचे उत्तर प्रदेशचे रहिवासी असलेले मनोज कुमार यांचं अत्यंत गरिब परिस्थित बालपण गेले परंतु मेहनत आणि जिद्दीच्या जोरावर त्यांनी यूपीएससी परीक्षा क्रॅक केली. त्यांना लहानपणी खूप काम करावे लागले.

त्यांना शाळेतदेखील खूप संघर्ष करावा लागेल. परिक्षेचा अभ्यास करण्यासाठीही त्यांच्याकडे साधने नव्हती. त्यांनी बारावीत असताना कॉपी केली होती. त्यामुळे ते नापास झाले होते. त्यांना आयुष्यात खूप अपयशाचा सामना करावा लागला. खूप लहानपणीच्या त्यांच्या खूप मोठी जबाबदारी पडली. त्यांना या काळात भावासोबत ऑटो-रिक्षा चालवावी लागली

एके दिवशी कागदपत्रे कमी असल्याने त्यांची रिक्षा जप्त केली. त्यासाठी त्यांना पोलिस स्टेशनमध्ये बोलवले. यावेळी त्यांना विचारले की डिविजनल मॅजिस्ट्रेट कसं बनू शकतात. याचवेळा त्यांना सरकारी अधिकारी होण्याची इच्छा निर्माण झाली. ही परीक्षा त्यांच्यासाठी सोपी नव्हती. परंतु त्यांनी या काळात खूप मेहनत केली.

मनोज यांना कधी-कधी मंदिराच्या बाहेर भिकारीसोबत झोपावे लागले. त्यांनी कुटुंबाला मदत करण्यासाठी शिपाई म्हणून काम केले.त्यांनी दिल्लीतील लायब्ररीमध्ये काम केले. यावेळी त्यांनी खूप पुस्तके वाचली. मनोज कुमार शर्मा यांनी ४ वेळी यूपीएससी परीक्षा दिली. ३ वेळा नापास होऊनदेखील त्यांनी चौथ्या वेळी पुन्हा प्रयत्न केला. त्यांनी १२१ रँक मिळवून आयपीएस बनले. त्यांचा प्रवास खूपच प्रेरणादायी आहे. त्यांच्या आयुष्यात 12th FAIL नावाचा चित्रपटदेखील आला आहे. विक्रांत मेस्सीने या चित्रपटात मनोज कुमार शर्मा यांची यशोगाथा सांगितली आहे.

Share This Article