⁠
Inspirational

अभिनेत्री ते आयपीएस अधिकारी; सिमाला यांचा अनोखा प्रवास..

खरंतर, वरील शीर्षक वाचून आश्चर्य वाटले असेल…पण ते खरे आहे. मध्य प्रदेशची राजधानी भोपाळ येथे राहणाऱ्या आयपीएस अधिकारी सिमाला प्रसाद यांचा हा प्रवास.त्यांना लहानपणापासूनच नृत्य आणि अभिनयाची आवड होती. तेवढीच अभ्यासाची देखील आवड होती. सिमाला यांचे वडील डॉ. भगीरथ प्रसाद देखील आयएएस अधिकारी होते. त्यानंतर ते खासदार झाले. त्यांची आई मेहरुन्निसा परवेझ या सुप्रसिद्ध साहित्यिक आहेत.

सिमाला यांचे प्राथमिक शिक्षण सेंट जोसेफ कोएड स्कूलमध्ये झाले. स्टुडंट्स फॉर एक्सलन्स (IEHE) मधून त्यांनी पदवी शिक्षण पूर्ण केले. तर बरकतुल्ला विद्यापीठातून त्यांनी समाजशास्त्रात पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले. या दरम्यान महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना त्यांनी नृत्य आणि अभिनयाची आवड जोपासली. त्यांनी वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये भाग घेतला. महाविद्यालयीन काळात अनेक नाटकांमध्येही काम केले. ‘अलिफ’ हा सिमाल यांचा ​​पहिला चित्रपट होता आणि तो फेब्रुवारी 2017 मध्ये प्रदर्शित झाला होता. यानंतर सिमाला यांनी 2019 मध्ये रिलीज झालेल्या ‘नक्कश’ चित्रपटातही काम केले. पण त्या परीक्षेत त्या अव्वल होत्या. त्यांना सुवर्णपदकही मिळाले.

यानंतर सिमाला मध्य प्रदेश लोकसेवा आयोगाच्या एमपी पीएससी परीक्षेत उत्तीर्ण झाल्या. यानंतर त्यांनी ठरवले की आपण कोणतीही गोष्ट केली तर आपल्याला जमू शकते. म्हणून त्यांनी पुन्हा एकदा स्पर्धा परीक्षेची तयारी करायला सुरुवात केली. पीएससी परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर सिमाला प्रसाद यांची पहिली पोस्टिंग डीएसपी म्हणून झाली. या नोकरीदरम्यान त्यांनी यूपीएससी परीक्षेची तयारी सुरु केली आणि पहिल्याच प्रयत्नात यश मिळवले. यातून त्यांना आयपीएस हे पद मिळाले.

Related Articles

Back to top button