⁠  ⁠

क्रिकेटपटू ते आयपीएस अधिकारी ; वाचा कार्तिक मधिरा यांची यशोगाथा !

Chetan Patil
By Chetan Patil 1 Min Read
1 Min Read

UPSC IPS Success Story : कार्तिक यांना लहानपणापासूनच क्रिकेटची प्रचंड आवड होती. त्यांना भारतातील स्टार क्रिकेटर बनायचे होते. परंतू हैदराबादमध्ये जन्मलेल्या आणि वाढलेल्या कार्तिक मधिराने अंडर-१३ अंडर-१५, अंडर-१७ आणि अंडर-१९ स्तरांवर आणि विद्यापीठ स्तरावर क्रिकेट खेळले आहेत. या दरम्यान शारीरिक दुखापती झाल्या. त्यामुळे, त्यांनी वयाच्या विशिष्ट टप्प्यावर क्रिकेट सोडून सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी स्पर्धा परीक्षेची तयारी करायला सुरुवात केली.

कार्तिक मधिरा हा मूळचा हैदराबादचा रहिवाशी आहे.भारतीय पोलीस सेवेत येण्यापूर्वी, कार्तिक मधिराने जवाहरलाल नेहरू टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटी (JNTU) मधून संगणक विज्ञान अभियांत्रिकीची पदवी पूर्ण केली. आयपीएस अधिकारी होण्याआधी कार्तिक मधीराकडेही सहा महिने नोकरी होती पण त्याला लवकरच नागरी सेवांबद्दलची आवड लक्षात आली.कार्तिकला यूपीएससीच्या पहिल्या तीन प्रयत्नांमध्ये सतत अपयशाचा सामना करावा लागला. एवढेच नव्हे त्याला पूर्व परीक्षाही पास होणे जमले नव्हते. मात्र, कार्तिकाने त्याने हार न मानता आपली तयारी सुरुच ठेवली.

समाजशास्त्र या पर्यायी विषयाच्या अभ्यासावर त्याने जास्त भर दिला. युपीएससीच्या २०१९ च्या परीक्षेत त्याच्या चौथ्या प्रयत्नात कार्तिक मधिराने १०३वा क्रमांक मिळवला आहे .सध्या महाराष्ट्र केडरमध्ये नियुक्त करण्यात झाली आहे.इंजिनिअरिंग क्षेत्रातील पदवीधर, क्रिकेटवर प्रचंड प्रेम आणि स्वतः उत्तम क्रिकेटपटू….आता आयपीएस अधिकारी हा संपूर्ण प्रवास अनेकांना प्रेरणादायी आहे.

Share This Article