UPSC IPS Sucess Story : आपले एक निश्चित ध्येय अनेकांना प्रेरणा देणारे ठरते. तसाच, तनूश्रीचा प्रवास आहे. तनू श्रीच्या घरी तसे शैक्षणिक वातावरण होते.तिच्या यशाचं श्रेय तिची आई नीलम प्रसाद आणि वडील सुबोध कुमार यांना देते. तिचे वडील माजी डीआयजी होते, जे नेहमीच तिचे सर्वांत मोठे प्रेरणास्थान राहिले आहेत. वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवून तिने प्रवासाला सुरुवात सुरुवात केली.
तनुश्रीचे शालेय शिक्षण हे बिहारच्या मोतिहारी जिल्ह्यात झाले. तिच्या वडिलांच्या वेगवेगळ्या ठिकाणच्या पोस्टिंगच्या काळात तिला अनेक शहरे जवळून बघायला मिळाली. तिने डीएव्ही पब्लिक स्कूल, बोकारो येथून बारावी वी पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. नंतर स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी दिल्ली गाठले. तिने या दरम्यान पदवीचे देखील शिक्षण पूर्ण केले. तिचा प्रथम केंद्रीय राखीव पोलीस दलात (CRPF) असिस्टंट कमांडंट, नंतर आयकर अधिकारी आणि नंतर आयपीएस अधिकारी असा प्रवास झाला. तिचे २०१४ मध्ये तनु श्री यांनी केंद्रीय राखीव पोलीस दलात (CRPF) असिस्टंट कमांडंट बनून शासकीय सेवेत काम चालू झाले.२०१५ मध्ये तिनं लग्न केलं आणि लग्नानंतर घरातल्या जबाबदाऱ्यांसह ती तिची स्वप्नंदेखील पूर्ण करण्याच्या मार्गावर होती. नंतरही तिने अभ्यास चालू ठेवण्याचा निर्णय घेतला.
तिचे युपीएससी करणे आणि त्यात यशस्वी होणे हे मुख्य ध्येय होते.यावेळी यूपीएससी परीक्षेत यश मिळवण्याचे लक्ष्य समोर होते. अहोरात्र तयारी केल्यानंतर त्या २०१६ मध्ये परीक्षेला बसल्या. तिचे मे २०१७ मध्ये हे स्वप्न पूर्ण झाले. तिला आयपीएस अधिकारी हे पद मिळाले. तनु श्रीचा हा प्रवास हैदराबादमधील प्रतिष्ठित पोलीस अकादमीत प्रशिक्षण घेऊन सुरू झाला. तिच्या या प्रवासात कुटुंबाचा खूप मोठा वाटा आहे. तिची मोठी बहीण मनुश्री देखील सीआरपीएफ कमांडंट आहे. मनू यांनी संपूर्ण प्रवासात धाकट्या बहिणीला खूप प्रेरणा आणि प्रोत्साहन दिले.