UPSC IRS Success Story : दरवर्षी बरेच विद्यार्थी हे युपीएससीची परीक्षा देतात, यातील फक्त काही निवडक विजयी होतात. बरेच अडथळे, कित्येक समस्या आणि शैक्षणिक प्रवास यातून मार्ग काढत यशापर्यंतचा प्रवास असतो. काहीजण नागरी सेवा परीक्षेसाठी सखोल अभ्यास करण्यासाठी सहा ते सात वर्षे देतात. अनेक इच्छुक एक किंवा दोन अयशस्वी प्रयत्नांनंतर आशा गमावतात आणि पर्यायी करिअर मार्ग निवडतात, जे परीक्षा उत्तीर्ण होतात आणि IAS, IPS किंवा IFS अधिकारी पदावर पोहोचतात. यात सातत्यपूर्ण कठोर परिश्रम आणि चिकाटी महत्त्वाची असते. अशाच एक सातत्याचे सामर्थ्य दाखवत पद मिळवणाऱ्या IRS अधिकारी पूजा राणावत आहेत.
जिने २०१७ मध्ये UPSC परीक्षा उत्तीर्ण करून २५८ची अखिल भारतीय रँक (AIR) मिळवून उल्लेखनीय कामगिरी केली. तिचा हा प्रवास अतुलनीय समर्पण आणि चिकाटीने कशी पुढे नेऊ शकतो याचे जीवंत उदाहरण आहे.
पूजाने पुण्यात वाढलेल्या पूजाने सेंट ऍन्स शाळेत शिक्षण पूर्ण केले. तर पुण्याच्या फर्ग्युसन कॉलेजमध्ये मानसशास्त्राची पदवी घेतली. त्यानंतर राज्यशास्त्रात पदव्युत्तर (एम. ए) शिक्षण घेतले. पूजाला माय पार्लमेंट फेलोशिप ही मिळालेली आहे. या फेलोशिपच्या माध्यमातून संसदीय काम आणि त्यातील बारकावे समजले. म्हणूनच, तिने महाविद्यालयीन शिक्षण घेतानाच प्रशासकीय सेवेत अधिकारी होण्याचे ध्येय निश्चित केले होते.
महाविद्यालयीन काळातच यूपीएससी परीक्षेची तयारी कॉलेजमध्ये सुरू केली. प्रिलिम्स क्लिअर करण्याच्या चार अयशस्वी प्रयत्नांमुळे तिला अनेक अडचणींचा सामना करावा लागला. तरीही, पूजाने निराश न होता. सातत्याने अभ्यास केला. अखेर २०१७ मध्ये, तिच्या पाचव्या प्रयत्नात, तिची भारतीय महसूल सेवा (IRS) पदासाठी निवड झाली.प्रशासकीय सेवेत अधिकारी व्हावे, असे तिच्या वडिलांचे स्वप्नं होते, ते पूर्ण झाले. सध्या पूजा आयकर विभागात उपायुक्त म्हणून कार्यरत आहेत.