UPSC : केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत 1261 जागांसाठी भरती
UPSC Recruitment 2023 केंद्रीय लोकसेवा आयोग (UPSC) मार्फत मोठी भरती निघाली आहे. यासाठीची आयोगाने भरतीची अधिसूचना संबंधित संकेतस्थळावर प्रसिद्ध केली आहे. त्यानुसार पात्र उमेदवार ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतो. अर्ज करण्याची शेवटची तारीख 9 मे 2023 पर्यंत आहे.
रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता ;
1) केंद्रीय आरोग्य सेवेच्या सामान्य कर्तव्य वैद्यकीय अधिकारी उप-संवर्गातील वैद्यकीय अधिकारी श्रेणी: 584 पदे
2) रेल्वेमध्ये सहाय्यक विभागीय वैद्यकीय अधिकारी: 300 पदे
3) नवी दिल्ली नगरपरिषदेत जनरल ड्युटी मेडिकल ऑफिसर: 1 पद
4) दिल्ली महानगरपालिकेत जनरल ड्युटी मेडिकल ऑफिसर ग्रेड-II: 376 पदे
शैक्षणिक पात्रता
या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी अंतिम MBBS परीक्षेतील लेखी आणि व्यावहारिक भाग उत्तीर्ण केलेला असावा.
वयो मर्यादा : 1 ऑगस्ट 2023 रोजी 32 वर्षांपेक्षा जास्त नसावी.
परीक्षा फी : सर्व उमेदवारांसाठी अर्ज शुल्क ₹ 200/- आहे. महिला/SC/ST/PWBD उमेदवारांना शुल्क भरण्यापासून सूट देण्यात आली आहे.
पगार – नियमानुसार
शारीरिक आणि वैद्यकीय मानके:
परीक्षेच्या नियमांच्या परिशिष्ट III मध्ये समाविष्ट असलेल्या नियमांनुसार एकत्रित वैद्यकीय सेवा परीक्षा, 2023 साठी शारीरिक/वैद्यकीय मानकांनुसार उमेदवार शारीरिक आणि वैद्यकीयदृष्ट्या तंदुरुस्त असणे आवश्यक आहे.
नोकरी ठिकाणी : अधिसूचनेत
निवड प्रक्रिया
परीक्षा, व्यक्तिमत्व चाचणी आणि दस्तऐवज पडताळणी
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 9 मे 2023
परीक्षेची तारीख : 16 जुलै 2023