UPSC Success Story कोणतीही परीक्षा असली तरी संयम खूप महत्त्वाचा आहे.तसेच अभिजय पगारेला पहिल्या प्रयत्नात अपयश आले परंतू खचून न जाता जोमाने अभ्यास केला आणि यश मिळवले. जालन्याच्या अभिजय पगारे याने देशात ८४४वा क्रमांक मिळविला आहे. पहिल्या प्रयत्नात मुलखात दिल्यानंतर त्याच्या पदरी अपयश आलं होतं. मात्र या अपयशाने खचून न जाता त्याने तयारी सुरूच ठेवली. दुसऱ्या प्रयत्नात मात्र यश मिळाले.
अभिजयची जडणघडण ही जालना जिल्ह्यात झाली. त्याचे वडील हे जेईएस महाविद्यालयातील उपप्राचार्य आहेत. त्यामुळे लहानपणापासून घरात शैक्षणिक वातावरण होते. त्याचे शालेय शिक्षण ते बारावीपर्यंतचे शिक्षण हे जालना जिल्ह्यातच झाले. त्यानंतर एनआयटी वारंगल येथे त्याने कॉम्प्युटर सायन्समध्ये पदवी मिळविली. पदवी मिळाल्यानंतर अभिजय पगारे याने बंगळूरू येथील एका कंपनीत सॉफ्टवेअर अभियंता म्हणून नोकरी स्वीकारली. पण नोकरीत त्याचे काही मन रमले नाही. त्यामुळे त्याने प्रशासकीय सेवेत जाण्यासाठी स्पर्धा परीक्षेची तयारी करण्याचा निर्णय घेतला. त्याने सुरूवातीला नोकरी करून अभ्यास केला. पण त्यात ताळमेळ न बसल्याने अपयश येत होते. पुढे त्याने पुन्हा जोमाने अभ्यासाला सुरुवात केली.
या दुसऱ्या प्रयत्नात मात्र त्याला यश मिळाले. यूपीएससीच्या निकालात त्याने ८४४वा क्रमांक मिळवला आहे. प्राप्त क्रमांकानुसार इंडियन फॉरेन सर्व्हिस किंवा इंडियन रेव्ह्यून्यू सर्व्हिसमध्ये नोकरीची संधी मिळणार आहे.