⁠  ⁠

आयुष्यातील अपयश ही यशाची पहिली पायरी; वाचा आयएएस आदित्य पांडे यांचा हा प्रवास

Chetan Patil
By Chetan Patil 1 Min Read
1 Min Read

UPSC Success Story : आयुष्यातील काही प्रसंग हे आपल्या आयुष्याला कलाटणी देणारे असतात. तसाच प्रवास आयएएस आदित्य पांडेचा आहे. आदित्य पांडे शाळेपासूनच खूप हुशार होते. त्याचे शालेय शिक्षण हे जामनगर येथे झाले. बारावी पास झाल्यानंतर वडिलांच्या आग्रहासाठी इंजिनियरिंगला प्रवेश घेतला.आदित्य यांनी इंजिनियरिंग आणि एमबीए केले आहे.

लहानपणी त्यांचे त्यांच्या गर्लफ्रेंडसोबत ब्रेकअप झाले तेव्हा ते खूप दुखी होते. त्यावेळी त्यांनी त्यांच्या गर्लफ्रेंडला सांगितले की, मी एक दिवस आयएएस ऑफिसर बनेल. त्यानंतर त्यांनी यूपीएससी परीक्षा देण्याचे ठरवले.त्यानंतर त्यांनी यूपीएससी परीक्षा दिली. जिद्द आणि प्रचंड अभ्यास करुन तुम्ही यूपीएससी परीक्षा पास करु शकतात. ही जिद्द तुम्हाला आयुष्यात आलेल्या अपयशातून मिळालेली असते.

हेच आदित्यच्या बाबतीत झाले. आदित्य यांनी २०२१, २०२२ साली यूपीएससी परीक्षा दिली. त्यावेळी त्यांना अपयश आले. पहिल्यादा प्रिलिम्सचा एकूण ५६-५८ प्रश्नांचा प्रयत्न केला. पण, २५ पेक्षा जास्त गुणांनी प्रिलिम पास करू शकले नाहीत. पण पुन्हा जोमाने अभ्यास करून परीक्षेची तयारी करायला सुरुवात केली. यूपीएससी (UPSC) परिक्षेत ४८ वी रँक प्राप्त करुन आदित्य यांनी आपल्या कुटुंबाचे नाव मोठे केले आहे.

Share This Article