UPSC Success Story : सामन्य कुटूंबात वाढलेल्या अनुष्का प्रवास हा कित्येक तरूणांना दिशादर्शक ठरणारा आहे.अनुष्काचे वडिल स्टेशनरी आणि झेरॉक्स दुकान चालवतात, तर आई गृहिणी आहेत. बोर्डे पती-पत्नींना स्वत:चं स्वप्न पूर्ण करणे शक्य झालं नाही. त्यामुळे मुलांनी शिकून मोठं व्हावं ही त्यांची मनापासून इच्छा होती.
जालना जिल्ह्यातील बदनापूर तालुक्यातील वाघरुळ दाभाडी हे अनुष्काचे मूळ गाव. पण कामाच्या निमित्ताने ते औरंगाबादमध्ये राहतात. त्यामुळेच, अनुष्काचे प्राथमिक शिक्षण हे औरंगाबादमधल्या लिटिल स्कोर अकॅडमीमध्ये झाले. त्यानंतर पोलीस पब्लिक स्कूलमध्ये तिने माध्यमिक शिक्षण पूर्ण केले. अनुष्काला शाळेतील शिक्षकांकडून सैन्य दलाबद्दलची माहिती मिळाली होती. त्यांनी सैन्यात करिअर करण्यासाठी अनुष्काला प्रेरित केलं.
या विषयावरची पुस्तकं वाचल्यानंतर सैन्यात जाऊन देशसेवा करण्याचा तिने निर्धार केला. तिला बारावीच्या परीक्षेत देखील ९१% गुण मिळाले. हीच अभ्यासातील गती तिने पुढे देखील चालू ठेवली. तसा तिने बारावीनंतर अभ्यासला सुरूवात केली आणि खऱ्या प्रवासाला सुरुवात झाली.केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या वतीने घेण्यात आलेल्या नॅशनल डिफेन्स अकॅडमी आणि नेव्हल डिफेन्स परीक्षेसाठी ती रोज दहा ते अकरा तास अभ्यास करायची.
पहाटे चार वाजता उठून दिवसाची सुरुवात करत असे. त्यासाठी तिने गणित आणि सामान्यज्ञान या विषयाकडं विशेष लक्ष दिले. जुन्या प्रश्नपत्रिका सोडवण्याचा सराव केल्यानं परीक्षेच्या वेळी दडपण आले नाही.त्यामुळे, ही परीक्षा देखील ती चांगल्या गुणांनी पास झाली. इतकेच नव्हे तर अनुष्कानं देशात दुसरी आणि मुलींमध्ये पहिले येण्याचा मान मिळवलाय.या देशातील कठीण समजल्या जाणाऱ्या परीक्षेचा निकाल जाहीर झाला आणि या परीक्षेत औरंगाबादच्या अनुष्का बोर्डेनं बाजी मारली. हे तिच्या आई – वडिलांसाठी अभिमानाची गोष्ट होती