⁠
Inspirational

चारवेळा अपयश आले तरी खचून न जाता आशिष झाला IAS अधिकारी

UPSC Success Story : आपल्याला आयुष्यात प्रत्येकवेळी यश येईलच असे नाही. कधी अडचणींना तर कधी कठीण परिस्थितीला सामोरे जावे लागते. असेच, राजस्थानची राजधानी जयपूर हे आशिष कुमार सिंघल. यूपीएससी परीक्षेत आशीषला चार वेळा अपयशाचा सामना करावा लागला. पण यात त्यांनी हार न मानता सातत्याने प्रयत्न करीत राहिले. आशिष कुमार सिंघल यांची आई सुधा या गृहिणी आहेत, तर वडील रमेशचंद्र अग्रवाल हे सरकारी शिक्षक होते.

आशिष हे लहानपणापासून हुशार असल्याने त्यांना अभ्यासात अधिक आवड होती. त्यांच्या आयुष्याचे दोन टप्पे महत्त्वाचे आहेत.‌ त्यांनी आयआयटीमध्ये प्रवेश घेण्यासाठी आशिष कुमार सिंघल यांनी प्रथम जेईई परीक्षा उत्तीर्ण केली. त्यानंतर सरकारसाठी काम करण्याचे ध्येय साध्य करण्यासाठी त्यांनी यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण केली. या महाविद्यालयीन जीवनात आयआयटी टॉपरदेखील होता, त्याने औद्योगिक व्यवस्थापन विषयात एम.टेक. पदवी घेतली. त्यानंतर त्याने गुरुग्राममधील एका कंपनीत एक वर्ष काम केले; परंतु त्यानंतर चांगल्या पॅकेजची नोकरी सोडून त्याने यूपीएससी परीक्षेची तयारी करण्याचे ठरवले. त्यासाठी त्यांनी घरीच अभ्यास करायचे ठरवले. पण त्यांना पहिल्या प्रयत्नात अपयश आले.

त्यांनी २०१९ मध्ये पहिला प्रयत्न केला होता. मग २०२० मध्ये तो दुसऱ्यांदा प्रीलिममध्येही नापास झाला. तिसऱ्या प्रयत्नात त्याला पुन्हा मेन ‘क्लीअर’ करण्यात अपयश आले. या परीक्षेत वारंवार नापास झाल्यामुळे नातेवाईक आणि मित्रमंडळी त्याला टोमणे मारू लागले. पण त्यांनी हार मानली नाही. सतत संयमाने अभ्यास करत राहिले. यात आई – वडिलांचा पाठिंबा महत्त्वाचा होता.‌ आई-वडिलांच्या पाठिंब्याच्या जोरावर त्याने २०२२ मध्ये चौथ्यांदा प्रयत्न केला. अखेर, या प्रयत्नांना यश आले आणि ते आय.ए.एस अधिकारी झाले.

Related Articles

Back to top button