---Advertisement---

अपयश आले तरी खचून न जाता जिद्दीने प्रयत्न केले तर यश मिळतेच ; वाचा अश्विनी यांचा प्रवास…

By Chetan Patil

Published On:

---Advertisement---

UPSC Success Story : आपण देखील वडिलांसारखे देशसेवा आणि लोकसेवा करण्यासाठी अहोरात्र मेहनत घ्यायची हा ध्यास उराशी बाळगून त्यांनी प्रयत्न केले आणि यशस्वी प्रयत्न ठरले. अश्विनी तानाजी वाकडे या मूळच्या माढा तालुक्‍यातील (बोकडदरवाडी) उपळाई बुद्रूक येथील रहिवासी. त्यांचे मोठे बंधू अमरदीप वाकडे हे कराड (जिल्हा सातारा) येथे कार्यरत आहेत. तर दुसरी मोठी बहीण मीनाक्षी वाकडे या लातूर येथे वित्त व लेखा अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. उपळाई बुद्रूक हे अधिकाऱ्यांचे गाव म्हणून राज्याला परिचित आहे. त्यात अजून एका अधिकाऱ्याची भर पडली आहे.

अश्विनी यांचे प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद, घेरडी (ता. सांगोला) येथे झाले. शालेय जीवनापासून हुशार असल्याने त्यांनी नवोदय विद्यालयात जाण्याचा मार्ग निवडला. त्यामुळे त्यांचे माध्यमिक शिक्षण जवाहर नवोदय विद्यालय, पोखरापूर (ता. मोहोळ) तर अकरावी व बारावीचे शिक्षण शिवाजी कॉलेज, बार्शी येथे झाले. एमबीबीएसचे शिक्षण पुणे येथे झाले. यादरम्यान त्यांना स्पर्धा परीक्षेची आवड निर्माण झाली.

त्यानंतर गेल्या चार वर्षांपासून त्या स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत होत्या. दोन वेळा यशाने हुलकावणी दिली होती. जिद्द आणि चिकाटी इतकी होती की त्यांनी अभ्यास करायचा सोडला नाही. न खचता अभ्यास सुरू ठेवला‌…तिसऱ्या प्रयत्नात घवघवीत यश संपादन केले आहे. घरातील मोठे भाऊ, बहीण व वडील हे सर्वच प्रशासकीय क्षेत्रात कार्यरत असल्याने व घरात शैक्षणिक वातावरण असल्याने अभ्यास करण्यासाठी मार्गदर्शन मिळाले. त्यामुळे त्यांनी २००वा क्रमांक मिळवत युपीएससी परीक्षेत यश मिळवले व आय.ए.एस पदासाठी निवड झाली.

Join WhatsApp Group

Join Now

Join Telegram Channel

Join Now

Related Posts