⁠  ⁠

वडिलांची हत्या करणाऱ्या नराधमांना शिक्षा देण्यासाठी बजरंग बनला IAS ऑफिसर

Chetan Patil
By Chetan Patil 1 Min Read
1 Min Read

UPSC Success Story : आयुष्यात अशा काही घटना घडतात त्या आयुष्याचा मार्ग दाखवतात. बजरंग यादव हे उत्तर प्रदेशातील बस्ती येथील धोभाट गावचे रहिवासी आहेत. त्यांचे वडील शेतकरी होते. त्यांचे सुरुवातीचे शिक्षण बस्ती येथील बहादूरपूर येथे झाले.बजरंग यांनी प्रयागराज विद्यापीठातून गणितात पदव्युत्तर शिक्षण घेतले, ज्यामध्ये ते अव्वल ठरले. त्यानंतर ते दिल्लीला गेले आणि त्यांनी यूपीएससी परीक्षेची तयारी सुरू केली.

२०१९ च्या परीक्षेच्या तयारीसाठी बजरंग दिल्लीला गेले होते. त्याचवेळी बजरंग यांच्या वडिलांनी नेहमीप्रमाणे अनेक गरीब-गरजू लोकांना मदत केली म्हणून काही गुंडांनी त्यांची हत्या केली. बजरंग पहिल्या परीक्षेसाठी तयारी करणार असताना त्यांच्या वडिलांचा खून झाला. त्यानंतर बजरंग हे खूप खचून गेले.त्यावेळी बजरंग यादव यांनी आपल्या वडिलांच्या अंत्यसंस्काराच्या वेळी वडिलांची हत्या करणाऱ्या नराधमांना एक दिवस शिक्षा करणार असल्याची शपथ घेतली आणि यूपीएससीची तयारी सुरू केली.

त्याला दोन प्रयत्नात अपयश आले. पहिल्या दोन परीक्षांमध्ये अपयश आल्यानंतर बजरंग सातत्याने प्रयत्न करत राहिले.पण, शेवटी तिसऱ्या प्रयत्नात ते नागरी सेवा परीक्षेत यशस्वी झाले, शिवाय परीक्षेत त्यांनी ४५४ वा क्रमांक मिळवला.

Share This Article