अभिमानाची गोष्ट; एकाच वर्षी दोन्ही सख्ख्या बहिणी झाल्या प्रशासकीय अधिकारी ! वाचा त्यांची ही यशोगाथा..
UPSC Success Story एवढी खडतर प्रक्रिया पार करून लाखो विद्यार्थी सरकारी सेवेत प्रवेश मिळवण्याच्या उद्देशाने परीक्षेसाठी अर्ज करतात. परंतू, त्यापैकी काहीच विद्यार्थी पदासाठी पात्र ठरतात. यामुळेच, युपीएससीची परीक्षा उत्तीर्ण झालेले उमेदवार अत्यंत हुशार मानले जातात आणि ही उमेदवाराच्या कुटुंबासाठी आणि संपूर्ण शहरासाठी अभिमानाची बाब आहे.
हे यशस्वी उमेदवार परीक्षेची कशी तयारी करतात?, त्यांचे वेळापत्रक कसे असते? हे इतर सर्व विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी बाब आहे. अशाच या दिल्लीतील दोन बहिणी…या एकाच वर्षी परीक्षेला बसल्या होत्या आणि त्याचवर्षी उत्तीर्णही झाल्या. वाचा या दिल्लीतील अंकिता जैन आणि वैशाली जैन यांची यशोगाथा….
नवी दिल्लीतील अंकिता जैन आणि वैशाली जैन यांनी युपीएससीची परीक्षा २०२० मध्ये उत्तीर्ण केली. त्या वर्षी दुसऱ्या प्रयत्नात वैशाली जैन हिने AIR २१ आणि तिची बहीण अंकिता जैन हिने चौथ्या प्रयत्नात AIR 3 मिळवले. खरंतर, दोन बहिणींसाठी हे कठीण होते. कारण त्यावेळी वातावरणात कोरोनाचा महामारी काळात सुरू होता. याच काळात त्या दोघींनाही धोकादायक कोरोना विषाणूची लागण झाली होती.ज्यामुळे त्यांचे कुटुंब खूप चिंताग्रस्त होते पण बहिणी खूप धाडसी असल्याने संकटावर मात करत यश मिळवले.
अंकिता जैन यांनी सुरुवातीला २०१७ मध्ये पहिला प्रयत्न केला पण तो अयशस्वी ठरला.आता ती भारतीय लेखापरीक्षण आणि लेखा सेवा अधिकारी म्हणून मुंबईत रूजू आहे.अंकिताने आता महाराष्ट्रातील आयपीएस अधिकारी अभिनव त्यागीशी लग्न केले आहे.
वैशाली, तिची धाकटी बहीण देखील पहिल्याच प्रयत्नात प्रिलिम्स पास करू शकली नाही. वैशाली ही दिल्ली टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटी (DTU) मधून बी.टेक ग्रॅज्युएट आहे. जिथे ती सुवर्णपदक विजेती होती. बी.टेक केल्यानंतर वैशालीने इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (आयआयटी) दिल्ली येथून एम.टेक केले. ती देखील सुवर्णपदक विजेती ठरली. ती अभियांत्रिकी शिक्षण पूर्ण करत असताना, वैशालीने अर्धा दिवस अभियांत्रिकीचा आणि अर्धा दिवस स्पर्धा परीक्षेचा अभ्यास केला. तिच्या कुटुंबाने तिला नेहमीच आय.ए.एस अधिकारी होण्यासाठी प्रोत्साहन दिले.यात तिची सर्वात मोठी प्रेरणा मोठी बहीण आहे.
तिच्या अनुभवातून ती देखील शिकत गेली. सध्या त्यांची सहाय्यक कलेक्टर म्हणून नियुक्ती झाली आहे. या संपूर्ण तयारीच्या काळात या दोघींनी एकत्रच अभ्यास करत असल्याने एकमेकींना अभ्यासात मदत झाली. तसेच यात घरच्यांचा पाठिंबा देखील होता. यांचे वडील सुशील कुमार जैन हे व्यापारी आहेत तर तिची आई अनिता जैन गृहिणी आहेत. अत्यंत साध्या कुटुंबातील या दोन्ही लेकीचे आई – वडिलांचे नाव उज्ज्वल केले आणि अभिमान वाढवला.