---Advertisement---

अल्पभूधारक शेतकऱ्याची लेकाने पटकावला UPSC परीक्षेत ३९५वा रॅंक….

By Chetan Patil

Published On:

---Advertisement---

UPSC Success Story आर्थिक परिस्थिती बेताची….साडेचार एकर जमीन… सोयाबीन, कापूस, तूर हंगामी पिके… संपूर्ण कुटुंब शेतीवर अवलंबून असे असले तरी शिवणी बुद्रूक येथील केशवराव जाधव यांनी आपल्या मुलाला उच्च शिक्षित केले आणि युपीएससी परीक्षेसाठी पाठिंबा दिला.

डॉ. अंकेत केशवराव जाधव यांना पहिल्याच प्रयत्नांत केंद्रीय लोकसेवा आयोग (युपीएससी) परिक्षेत ३९५ रँक मिळाली आहे.हिंगोली जिल्ह्यातील शिवणी ब्रुद्रुक (ता. कळमनुरी) येथील रहिवासी.त्याचे शालेय शिक्षण शिक्षण शिवणी येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत तर पाचवी ते दहावी पर्यंतचे शिक्षण कळमनुरी येथील महात्मा फुले विद्यालयात झाले

दहावीच्या परिक्षेत ९८ टक्के गुणसंपादन करुन अंकेत जिल्ह्यात प्रथम आला होता. नांदेडच्या यशवंत महाविद्यालयातून २०१६ मध्ये बारावी (विज्ञान) ९५ टक्के गुणांनी उत्तीर्ण झाला. सामाईक प्रवेश परिक्षाद्वारे पुणे येथील बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयात (ससून) एम. बी. बी. एस. साठी प्रवेश मिळाला.

२०२२ मध्ये एमबीबीएस उत्तीर्ण झाल्यानंतर पुणे येथेच इंटर्नशिप करत असताना स्पर्धा परीक्षेची आवड निर्माण झाली. यातूनच त्याने युपीएससी परीक्षा देण्याचे ठरवले.दरम्यान डॉ. अंकेत यांची यंदाच्या मार्च महिन्यात जिल्हा परिषद अंतर्गत वैद्यकीय अधिकारी म्हणून निवड झाली. सुरवातीला गिरगाव व सध्या वाकोडी (ता. कळमनुरी) येथील प्राथमिक आरोग्य केंद्र येथे वैद्यकीय अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. पण नुसत्याच झालेल्या अंकेत केशवराव जाधव यांना पहिल्याच प्रयत्नांत केंद्रीय लोकसेवा आयोग (युपीएससी) परिक्षेत ३९५ रँक मिळाली आहे.

Join WhatsApp Group

Join Now

Join Telegram Channel

Join Now

Related Posts