लहानपणापासून आर्थिक परिस्थिती बेताची पण उच्च शिक्षणासाठीची जिद्द मात्र होती. राजेंद्र जगन्नाथ सूर्यवंशी आणि कल्पना राजेंद्र सूर्यवंशी (रा. दुसाणे, हल्ली सुरत, गुजरात) यांचा मुलगा डॉ. कल्पेश सूर्यवंशी याने हे दुहेरी यश मिळवले आहेहा त्यांचा प्रवास नक्कीच सोप्पा नव्हता. घरची परिस्थिती हलाखीची…त्यात वडिलांची वेल्डिंग कारखान्यात नोकरी, कसाबसा घरखर्च चालायचे. पण त्यांनी मुलांना उच्च शिक्षित केले.
आपल्या स्वप्नांना आकार देत, कुटुंबाला आर्थिक हातभार लावत, प्रसंगी नातेवाइकांकडून हातउसने घेऊन चारही मुला-मुलींना शिक्षण दिले. डॉ. कल्पेश. सूर्यवंशी कुटुंब मूळचे महाराष्ट्रातील दुसाणे (धुळे) येथील रहिवासी आहेत. सध्या त्यांचं कुटुंब गुजरातमधील सुरत येथे वास्तव्यास आहेत. त्यात ठिकाणी त्यांचे देखील शालेय शिक्षण पूर्ण झाले. गोरगरिबांच्या हितासाठी आणि गावासाठी काहीतरी करायला हवे. म्हणून, आरोग्य क्षेत्रातील त्यांनी जाण्याचे ठरवले. इतकेच नाहीतर
कल्पेशने मेडिकल क्षेत्रातील दिल्ली येथील डॉ. राममनोहर लोहिया हॉस्पिटलमधून एम.डीची उच्च पदवी घेऊन गुरू गोविंदसिंग इंद्रप्रस्थ विद्यापीठातून तिसरा आला.याच क्षेत्राच्या आधारित प्रशासकीय अधिकारी म्हणून देखील अभ्यास केला. वैद्यकीय क्षेत्रात झोकून देणाऱ्या कल्पेशनेथेट एमडीचे शिक्षण पूर्ण करून यूपीएससीच्या वैद्यकीय परीक्षेतही ३२० रँकने देशपातळीवर आपले नाव कोरले आहे. एका गरीब कुटुंबातील मुलाने प्रतिकूल परिस्थितीतही शिक्षणात उच्च शिखर गाठणारे मोठे यश मिळविले आहे.