UPSC Success Story : आपल्या लग्नानंतर प्रशासकीय अधिकारी होता येईल का? की हे स्वप्न अधुरं राहिलं? या विचाराने कितीतरी दाम्पत्य विचारात असतात. ही एका जोडप्याची कहाणी आहे…त्या दोघांनी मिळून अभ्यास केला आणि दोघेही भारतीय प्रशासकीय सेवेत अधिकारी बनले. त्यांनी नागरी सेवेची तयारी एकत्र सुरू केली आणि अखेरीस त्यांचे स्वप्न पूर्ण झाले. घनश्याम मीना हे प्रथम आयएएस अधिकारी म्हणून आपले स्थान मिळवले आणि नंतर आपल्या पत्नीला तेच स्वप्न पूर्ण करण्यास प्रवृत्त केले. आता, पती आणि पत्नी दोघेही उत्तर प्रदेश (UP) कॅडरमध्ये अधिकारी पदांवर आहेत. घनश्याम मीना, सध्या फिरोजाबादमध्ये महापालिका आयुक्त म्हणून कार्यरत असून, ते २०१५ च्या आयएएस बॅचचे आहेत. २०१७ च्या IAS बॅचमधील त्यांची पत्नी अनिता यादव सध्या अयोध्येत मुख्य विकास अधिकारी आहेत.
सात भावंडांच्या कुटुंबातील घनश्याम मीना. त्यांचे वडील अतिरिक्त आयुक्त होते, त्यांनी नेहमी शिक्षणाच्या महत्त्वावर भर दिला. सात भावंडांसह, सर्व वैद्यकशास्त्र, अभियांत्रिकी यांसारख्या विविध क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करत आहेत. घनश्याम यांनी पिलानी येथील बिर्ला वरिष्ठ माध्यमिक विद्यालयात शालेय शिक्षण पूर्ण केल्यानंतर अभियांत्रिकीचे उच्च शिक्षण घेतले. २००९ मध्ये पदवीधर झाल्यावर, त्यांना जागतिक आर्थिक मंदीच्या आव्हानांना तोंड दिले. ज्यामुळे नोकरीच्या संधी कमी झाल्या. तेव्हाच त्यांनी नागरी सेवांचा प्रवास सुरू करण्याचा निर्णय घेतला.
यूपीएससीच्या तयारीसाठी दिल्लीला गेल्यावर घनश्यामला सुरुवातीच्या अडचणींचा सामना करावा लागला. यशस्वी होण्याच्या निर्धाराने त्याने राजस्थान पीसीएस फॉर्म भरला आणि पहिल्याच प्रयत्नात लेखी परीक्षा पास केली. त्याच्या मुलाखतीची तयारी जोधपूरला केली. तिथेच त्यांची अनिता यांच्यासोबत भेट झाली. त्या देखील युपीएससीची तयारी करत होत्या. त्यानंतर दोघांनी एकत्र अभ्यास करण्याचा निर्णय घेतला.अनिता यांनी २०१३ मध्ये UPSC प्रिलिम्स पास केली होती.पण त्यांची पहिल्याच प्रयत्नात मुख्य परीक्षा यशस्वी झाली नाही. घनश्याम यांनी प्रशिक्षण आणि मार्गदर्शन देऊन त्यांना चिकाटीने प्रवृत्त केले. त्यानंतर त्यांनी २०१४ मध्ये राजस्थान पीसीएस केडर मिळवले.
लग्नानंतर देखील दोघांनी अभ्यास चालू ठेवला.
काम आणि अभ्यास यांचा समतोल साधण्याचे आव्हान हे जोडप्यासमोर होते. घनश्यामने वाणिज्य विभागात पूर्ण दिवस काम केल्यानंतर, संध्याकाळ यूपीएससीच्या तयारी करत असतं. अभ्यास, प्रामाणिक प्रयत्न आणि चिकाटी या जोरावर दोघेही प्रशासकीय अधिकारी बनले आणि दोघेही आय.ए.एस अधिकारी झाले.