⁠  ⁠

स्वतःचा फूड डिलिव्हरी स्टार्टअप ते प्रशासकीय अधिकारी; वाचा हिमांशूच्या चिकाटीचा प्रवास…

Chetan Patil
By Chetan Patil 2 Min Read
2 Min Read

UPSC Success Story : हिमांशूला चांगल्या पदावर कार्यरत राहून समाजासाठी कार्य करण्याची इच्छा होती. त्यामुळे त्याने यूपीएससीची परीक्षा देऊन प्रशासकीय सेवेत यायचे हे सुरुवातीलाच ठरविले होते. नोकरी सांभाळून मी ‘यूपीएससी’च्या परीक्षेच्या अभ्यास केला. वेळेचे नियोजन आणि स्वतःची अभ्यासपद्धती तयार करून
अभ्यास करायचा. हिमांशू हा मूळचा धुळ्याचा रहिवासी.

तो पाच वर्षांचाच असताना त्याच्या वडिलांचे निधन झाले आणि त्यानंतर तो आईसह मामाच्या घरी स्थायिक झाला. घरची आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने त्याने स्वतःचे काहीतरी करायचे ठरविले. त्यामुळे त्याने मुंबई विद्यापीठाशी संलग्नित लोकमान्य टिळक महाविद्यालयातून त्याने यांत्रिकी अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर तीन वर्ष एका खासगी कंपनीत त्याने काम केले. परंतु स्वतःचा छोटासा व्यवसाय असावा, हा विचार त्याच्या मनात होता.

त्यामुळे त्याने eat@night या नावाने फूड डिलिव्हरीचा स्टार्टअप सुरु केला. रात्री १० ते सकाळी ५ या वेळेत फूड डिलिव्हरीचे काम चालायचे. जवळपास एक वर्ष फूड डिलिव्हरीचे त्याचे काम यशस्वीरित्या सुरू होते. हे सर्व करत असताना त्याने अभ्यास देखील चालू ठेवला. २०१६, २०१७, २०१८, २०१९, २०२० अशी पाच वेळा त्याने ‘यूपीएससी’ परीक्षा दिली, परंतु यश आले नाही. त्यानंतर दोन वर्षे ब्रेक घेत पुन्हा २०२३ साली त्याने परीक्षा दिली आणि देशात ७३८ वा क्रमांक प्राप्त केला.

त्यानंतर ऊर्जा मंत्रालयाच्या सतलज जल विद्युत निगममध्ये अधिकारी म्हणून नियुक्ती असा प्रवास करीत हिमांशू टेंभेकर याने ‘यूपीएससी’ परीक्षेत घवघवीत यश प्राप्त केले.स्वतःची कार्यपद्धती असली की अभ्यास करणे सोपे जाते. हे हिमांशूने दाखवून दिले आहे.

Share This Article