UPSC Success Story : आपलं स्वप्न जोपर्यंत साकार होत नाही तोपर्यंत अभ्यास करत राहिला पाहिजे. हेच गाझीपूर जिल्ह्यातील खोजापूर गावातील अभिनंदन यादवने दाखवून दिले आहे. त्याचे शालेय शिक्षण हे खोजापूर येथील न्यू मॉडेल चिल्ड्रन स्कूलमध्ये झाले. त्यानंतर बारावी विज्ञान शाखेतून उत्तीर्ण झाल्यानंतर कोटा येथे पुढील शिक्षण पूर्ण केले. त्याने २०१८ मध्ये आय.आय.टी गुवाहाटीमध्ये शिक्षण घेण्यास सुरुवात केली. त्यानंतर २०२२ मध्ये पदवी प्राप्त केली.
२०२२ मध्ये पदवी घेतल्यानंतर अभिनंदनने गुरुग्राममधील क्युबॅशन कन्सल्टिंग प्रायव्हेट लिमिटेडमध्ये पद मिळवले.या कालावधीत त्याने एसएसबी लेखी परीक्षा उत्तीर्ण होऊन सरकारी परीक्षांसाठीही खूप मेहनत घेतली.लेखी परीक्षेत यश मिळूनही तब्बल १६ वेळा अपयशाचा सामना करावा लागला.
२०१७ ते २०२४ या कालावधीमध्ये अभिनंदनला तब्बल १६ वेळा परीक्षा दिल्या.कधी इंग्रजी विषयाबाबत अडचणी तर कधी मुलाखतीत अडथळे पण त्याने अभ्यासाची कास सोडली नाही.अखेर, यूपीएससी असिस्टंट कमांडंट परीक्षेत त्याला यश मिळाले. या प्रवासाच्या दरम्यान त्याने आपले संवाद कौशल्य सुधारले. आपले स्वप्न साकारण्यासाठी प्रयत्न करत राहिला त्यामुळे त्याला हे यश मिळाले.