जिद्दीला सलाम! १६ वेळा अपयश मिळाले, तरी जिद्द सोडली नाही, आज आहे असिस्टंट कमांडंट

Published On: नोव्हेंबर 22, 2024
Follow Us

UPSC Success Story : आपलं स्वप्न जोपर्यंत साकार होत नाही तोपर्यंत अभ्यास करत राहिला पाहिजे. हेच गाझीपूर जिल्ह्यातील खोजापूर गावातील अभिनंदन यादवने दाखवून दिले आहे. त्याचे शालेय शिक्षण हे खोजापूर येथील न्यू मॉडेल चिल्ड्रन स्कूलमध्ये झाले. त्यानंतर बारावी विज्ञान शाखेतून उत्तीर्ण झाल्यानंतर कोटा येथे पुढील शिक्षण पूर्ण केले. त्याने २०१८ मध्ये आय.आय.टी गुवाहाटीमध्ये शिक्षण घेण्यास सुरुवात केली. त्यानंतर २०२२ मध्ये पदवी प्राप्त केली.

२०२२ मध्ये पदवी घेतल्यानंतर अभिनंदनने गुरुग्राममधील क्युबॅशन कन्सल्टिंग प्रायव्हेट लिमिटेडमध्ये पद मिळवले.या कालावधीत त्याने एसएसबी लेखी परीक्षा उत्तीर्ण होऊन सरकारी परीक्षांसाठीही खूप मेहनत घेतली.लेखी परीक्षेत यश मिळूनही तब्बल १६ वेळा अपयशाचा सामना करावा लागला.

२०१७ ते २०२४ या कालावधीमध्ये अभिनंदनला तब्बल १६ वेळा परीक्षा दिल्या.कधी इंग्रजी विषयाबाबत अडचणी तर कधी मुलाखतीत अडथळे पण त्याने अभ्यासाची कास सोडली नाही.अखेर, यूपीएससी असिस्टंट कमांडंट परीक्षेत त्याला यश मिळाले‌. या प्रवासाच्या दरम्यान त्याने आपले संवाद कौशल्य सुधारले. आपले स्वप्न साकारण्यासाठी प्रयत्न करत राहिला त्यामुळे त्याला हे यश मिळाले.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Related Posts

वाह रे पठ्ठया! पहिल्याच प्रयत्नात पुण्याचा २२ वर्षीय तरुण झाला आयएएस

एप्रिल 23, 2025

यवतमाळच्या रिक्षाचालकाच्या लेकीने केली UPSC क्रॅक ; आता होणार जिल्हाधिकारी

एप्रिल 23, 2025
police

कोणतेही क्लासेस न लावता मारली MPSC परीक्षेत बाजी ; बनला पोलीस उपनिरीक्षक

एप्रिल 14, 2025

IAS होण्यासाठी तीन वेळा यूपीएससी क्रॅक केली ; चारू यांचा प्रेरणादायी प्रवास वाचा..

एप्रिल 1, 2025

डॉक्टर झाल्यानंतर UPSC परीक्षा देण्याचा निर्णय ; तिसऱ्या प्रयत्नात मिळविले यश, वाचा IFS अपाला मिश्रांचा प्रेरणादायी प्रवास

मार्च 19, 2025

राहण्यासाठी घर नाही, दोन वेळच्या जेवणाचेही पैसे नव्हते ; पठ्ठ्याने जिद्दीने UPSC क्रॅक केली अन् बनला IAS

मार्च 17, 2025