आदित्य श्रीवास्तवच्या जिद्दीला सलाम; UPSC परीक्षेत देशातून पहिला नंबर पटकावला..

Published On: नोव्हेंबर 25, 2024
Follow Us

UPSC Success Story : कोणत्याही परीक्षेत किंवा कामात यशस्वी होण्यासाठी ते जिद्द, मेहनतीसह सातत्य असेल तर यशाची पायरी गाठता येते. हेच आदित्य श्रीवास्तव याने करून दाखवले. केंद्रीय लोकसेवा आयोगाने नागरी सेवा परीक्षा २०२३ चा निकालात देशातून पहिला आला आहे. त्याचे मूळ गाव हे लखनऊ.तो शालेय जीवनापासून हुशार आणि अभ्यासू वृत्तीचा होता. त्याने बारावीच्या परीक्षेत ९५ टक्के गुण मिळावले. त्याने जेईई परीक्षा उत्तीर्ण केली आणि आयआयटी कानपूरमध्ये प्रवेश केला.

बीटेक आणि एमटेक केल्यानंतर सुवर्णपदक विजेता ठरला. पुढे त्याने काही दिवस नोकरी केली. पण त्याचे त्यात काही मन रमले नाही. त्यामुळे त्याने स्पर्धा परीक्षेकडे वळण्याचा निर्णय घेतला. त्याने जवळपास १५ महिने काम करत युनियन लोकसेवा आयोगाच्या (UPSC) परीक्षेची तयारी सुरू केली. काम करताना त्याने प्रीलिममध्ये पहिला प्रयत्न केला. पण हा प्रयत्न अयशस्वी ठरला. म्हणून, त्याने नोकरी सोडून अभ्यासाकडे लक्ष केंद्रित केले.

युपीएससीमध्ये पहिली रँक मिळवण्यासाठी २०१७ पासून मेहनत केली. त्याने तिसऱ्या प्रयत्नात यूपीएससी २०२ ची परीक्षा उत्तीर्ण केली. यात २१६ ची अखिल भारतीय रँक मिळवून आयपीएससाठी निवड झाली. त्याच्या आयपीएस प्रशिक्षणाव्यतिरिक्त तो पुन्हा अभ्यास करत राहिला. या प्रयत्नात तो देशातून पहिल्या क्रमांकाने उत्तीर्ण झाला. अखेर, आयएएस अधिकारी होण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी मेहनत यशस्वी झाली.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Related Posts

वाह रे पठ्ठया! पहिल्याच प्रयत्नात पुण्याचा २२ वर्षीय तरुण झाला आयएएस

एप्रिल 23, 2025

यवतमाळच्या रिक्षाचालकाच्या लेकीने केली UPSC क्रॅक ; आता होणार जिल्हाधिकारी

एप्रिल 23, 2025
police

कोणतेही क्लासेस न लावता मारली MPSC परीक्षेत बाजी ; बनला पोलीस उपनिरीक्षक

एप्रिल 14, 2025

IAS होण्यासाठी तीन वेळा यूपीएससी क्रॅक केली ; चारू यांचा प्रेरणादायी प्रवास वाचा..

एप्रिल 1, 2025

डॉक्टर झाल्यानंतर UPSC परीक्षा देण्याचा निर्णय ; तिसऱ्या प्रयत्नात मिळविले यश, वाचा IFS अपाला मिश्रांचा प्रेरणादायी प्रवास

मार्च 19, 2025

राहण्यासाठी घर नाही, दोन वेळच्या जेवणाचेही पैसे नव्हते ; पठ्ठ्याने जिद्दीने UPSC क्रॅक केली अन् बनला IAS

मार्च 17, 2025