⁠  ⁠

अखेर मेहनतीला मिळाले फळ ; पहिल्याच प्रयत्नात अनन्याने पटकावला भारतातून तिसरा क्रमांक !

Chetan Patil
By Chetan Patil 2 Min Read
2 Min Read

UPSC Success Story : जर कष्ट करायची तयारी असेल तर कोणतीही गोष्ट सहज शक्य होऊ शकते. त्यासाठी जिद्द व चिकाटी मात्र हवीच.अनन्या ही मेहबूबनगर या जिल्ह्यातील लेक.अनन्याच्या वडिलांचा स्वतःचा व्यवसाय आहे; तर आई गृहिणी आहे. त्यांच्या घरात नागरी सेवांमध्ये यशस्वीरीत्या प्रवेश करणारी ती पहिलीच आहे.घरच्यांनी तिला हव्या त्या कोर्सची निवड करण्याची मुभा दिली होती. खरे तर ती कलेक्टर होणार, असे तिचे आजोबा म्हणायचे. अनन्याने २०२१ मध्ये दिल्लीतील मिरांडा हाऊस येथून भूगोल विषयात आपले पदवी शिक्षण पूर्ण केले होते.

याच दरम्यान तिला स्पर्धा परीक्षेची गोडी निर्माण झाली आणि तिने तयारीला सुरुवात केली. प्रीलिम्ससाठी अनन्याने खरे तर थोड्या वेगळ्या पद्धतीने अभ्यास केला होता. त्या वेळेस ती भरपूर गोष्टी वाचण्यावर भर देत होती. मात्र, मुख्य परीक्षेकरिता तिने उजळणीवर भर दिला होता.

यूपीएससीची परीक्षा देण्याची ही तिची पहिली वेळ असली तरीही तिने दिलेली परीक्षा आणि मुलाखत ही त्यांच्यासाठी समाधानकारक होती.अनन्याने एवढ्या मोठ्या परीक्षेत यशस्वीरीत्या उत्तीर्ण होण्यासाठी केवळ अँथ्रोपॉलॉजी या विषयासाठी कोचिंगची मदत घेतली असली तरीही इतर कोणत्याही विषयासाठी खास प्रशिक्षण घेतले नव्हते. ही परीक्षा स्वतःच्या जिद्दीवर तिने उत्तीर्ण केली आहे.

अनन्या रेड्डीने प्रचंड मेहनत करून २०२३ च्या नागरी सेवा परीक्षेमध्ये संपूर्ण भारतातून तिसरा क्रमांक पटकावला आहे. पहिल्याच प्रयत्नात एवढे दमदार यश मिळविल्याचे श्रेय अनन्या नशीब, देवावरील विश्वास आणि कुटुंबाचा व मित्रांचा पाठिंबा यांना देते.

Share This Article