---Advertisement---

दोनदा प्रिलियम्समध्ये फेल, अखेर तिसऱ्या प्रयत्नात मिळाले यश : वाचा इशिता किशोर यांची यशोगाथा

By Chetan Patil

Published On:

---Advertisement---

यूपीएससी (UPSC) ही देशातील सर्वात अवघड परीक्षा असून यासाठी उमेदवार अहोरात्र मेहनत घेत असतात. यूपीएससी परीक्षेत यश मिळवणे ही खूप मोठी गोष्ट असते. दरम्यान ग्रेटर नोएडा (Noida) येथे राहणारी इशिता किशोर (Ishita Kishore) यांनी यूपीएससी परीक्षेतील तिसऱ्या प्रयत्नात संपूर्ण देशात पहिला क्रमांक मिळवला, ही गोष्ट निश्चितच प्रेरणादायी आहे. इशिता यांनी लहानपणापासूनच आयएएस अधिकारी व्हायचे ठरवले होते आणि त्या मार्गावर त्यांनी कधीही मागे वळून पाहिले नाही.

इशिता किशोर यांनी श्री राम कॉलेज ऑफ कॉमर्समधून अर्थशास्त्रात ग्रॅज्युएशन केले. त्या नेहमीच अभ्यासात हुशार होत्या आणि त्यांचे वडील एअरफोर्समध्ये ऑफिसर होते. २०१४ साली १२वीची परीक्षा दिल्यानंतर, त्यांनी ग्रॅज्युएशन पूर्ण केले आणि यूपीएससी परीक्षेची तयारी सुरू केली. परंतु पहिल्या दोन प्रयत्नांमध्ये प्रिलियम्सच्या टप्प्यातच त्यांना अपयश मिळाले.

या अपयशाने त्या खचल्या नाहीत. दिवसरात्र एक करून त्यांनी अभ्यास केला आणि तिसऱ्या प्रयत्नात त्यांनी यूपीएससी २०२२ परीक्षेत संपूर्ण देशात पहिला क्रमांक मिळवला. ही यशोगाथा निश्चितच अनेक युवा उमेदवारांसाठी प्रेरणा देणारी आहे.

Join WhatsApp Group

Join Now

Join Telegram Channel

Join Now

Related Posts