---Advertisement---

गवंडी कामगाराच्या मुलाने थेट यूपीएससी परीक्षेत मिळविले यश ; वाचा त्याची यशोगाथा

By Chetan Patil

Published On:

---Advertisement---

UPSC Success Story : अत्यंत प्रतिकूल परिस्थिती….आई – वडिलांनी मोलमजुरी करून कष्टाने वाढवले…गावातील एका साध्या दोन खोल्यांच्या घरात कोणत्याही चैनीच्या वस्तू नसताना निलेश अहिरवारने तरुण वयात देशातील सर्वात कठीण परीक्षा उत्तीर्ण केली आहे. मध्य प्रदेशातील इशपूर या छोट्याशा गावातील मुलगा. त्याचे वडील रामदास हे गावातच गवंडी काम करतात.

त्याचे शालेय शिक्षण हे गावातील प्राथमिक शाळेत झाले. तर नववी ते बारावी पर्यंतचे शिक्षण हे तवनगर मॉडेल स्कूलमध्ये झाले‌. बारावीनंतर त्यांनी २०२० मध्ये चित्रकूट येथील महात्मा गांधी ग्रामोद्योग विद्यापीठातून कृषी विषयात बी.टेक केले. पदवी शिक्षण पूर्ण केल्यानंतर नीलेशने आपल्या गावी परतण्याचा आणि यूपीएससीची तयारी करण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी त्याने दिवसरात्र मेहनत घेतली.

पण तो २०२१ आणि २०२२ मध्ये यूपीएससी प्रीलिम्सही पास करू शकला नाही….सलग दोन प्रयत्नात पराभूत झाल्यानंतर त्याने भोपाळला जाऊन तयारी करण्याचा निर्णय घेतला, जो त्याच्यासाठी योग्य ठरला. आधी झालेल्या चूकांवर त्याने विशेष लक्ष दिले. त्यानंतर त्याला तिसऱ्या प्रयत्नात हे यश मिळाले. अवघ्या २४ वर्षीय निलेशने मेहनतीने संपूर्ण कुटुंबाची हलाखीची परिस्थितीच बदलून ९१६ वा क्रमांक मिळवला आहे. एखादी गोष्ट मिळवण्यासाठी मेहनत, प्रयत्न आणि सातत्य ठेवल्यास यश मिळतंच हे या तरुणाने सिद्ध करून दाखवलं आहे.

Join WhatsApp Group

Join Now

Join Telegram Channel

Join Now

Related Posts