चांगल्या पगाराची नोकरी सोडून घेतला UPSC परीक्षेचा ध्यास आणि परमिता झाली यशस्वी !
UPSC Success Story : खरंतर आयुष्याच्या वळणावर प्रत्येक निर्णय महत्त्वाचा असतो. तसेच परमिताने एक धाडसी निर्णय घेतला आणि तिच्या आयुष्याला कलाटणी मिळाली. चांगल्या पगाराची कॉर्पोरेट क्षेत्रात नोकरीची संधी असूनही यात करिअर न करता. तिने युपीएससी परीक्षा देण्याचे ठरवले. लगेच नोकरी सोडता पण येत नाही. परमिता मालाकार ही पश्चिम बंगाल मधील लेक. खरे तर परमिताला तिच्या नोकरीमुळे परीक्षेच्या तयारीसाठी पुरेसा वेळ देता येत नव्हता. पुढे तिची टी.सी.एसमधील नोकरीदेखील फार काळ टिकली नाही.त्याआधी ती कुटुंबाच्या आर्थिक परिस्थितीमुळे BPO मध्ये काम करायची. कारण तिची आर्थिक परिस्थिती बेताची होती.
२०१२ साली भौतिकशास्त्रात ऑनर्सची पदवी मिळवली. आपले ध्येय पूर्ण करण्यासाठी परमिताने यूपीएससी परीक्षा दिली; परंतु त्यामध्ये तिला प्राथमिक स्तरातही उत्तीर्ण होता आले नाही. पुढे २०२० साली परमिताने उपविभागीय माहिती आणि सांस्कृतिक अधिकारी (SDICO) हे महत्त्वपूर्ण पद प्राप्त केले. स्वतःचा आत्मविश्वास वाढविण्यासाठी परमिता लहान-लहान सरकारी नोकऱ्यांच्या परीक्षा देत यूपीएससी परीक्षेची तयारी करीत होती.२०२२ साली संपूर्ण तयारी करून, तिने प्रथम स्तर पार केला आणि नंतर ती मुख्य परीक्षेतदेखील उत्तीर्ण झाली होती; मात्र ती या वेळेस मुलाखतीच्या फेरीत बाद झाली.
पुढे सहाव्यांदा तिने या परीक्षेसाठी तयारी सुरू केली होती. २०२३ च्या परीक्षेत परमिताने प्राथमिक आणि मुख्य परीक्षा पार केल्यावर तिला मुलाखतीसाठी बोलावण्यात आले. आता तिचा आत्मविश्वास वाढला होता. काय अभ्यास आणि कसा करायचा हे तिला देखील समजले होते. त्या आधी तिला अनेक आव्हानांना सामोरे जावे लागले. युपीएससी मुख्य परीक्षेसाठी कोलकाता येथील एका कोचिंग संस्थेत प्रवेश घेतला. तसेच ती दर आठवड्याला मॉक टेस्ट देत असे. अशा प्रकारे तिने एकूण २८ मॉक टेस्ट दिल्या. हे तिच्या फार उपयोगी पडले. म्हणूनच युपीएससी परीक्षेत ८१२ क्रमांकासह ती यशस्वी झाली आहे.