UPSC Success Story : आपल्या मुलांना उच्च शिक्षित करून चांगल्या पदावर बघण्याचे प्रत्येक पालकाचे स्वप्न असते. तसेच तरूणाच्या वडिलांनी देखील स्वप्न बघितले आणि तिने ते साकार केले.
तरुणा कमल ही मंडी जिल्ह्यातील बाल्ह व्हॅलीची आहे. तिने तिच्या पहिल्याच प्रयत्नात युपीएससीच्या परीक्षेत २०३ रॅंकसह यश मिळवले आहे. कठोर परिश्रम हाच यश मिळवण्याचा एकमेव मार्ग आहे. यासाठी कोणताही शॉर्टकट नाही. यश मिळविण्यासाठी, एखाद्याने शॉर्टकटवर नव्हे तर कठोर परिश्रमावर लक्ष केंद्रित केले पाहिजे.
तरुणाचे वडील हे नगरपरिषदेतील सफाई कामगार आहेत तर तिची आई नॉर्मा देवी गृहिणी आहे. तिचे शालेय शिक्षण हे रत्तीच्या मॉडर्न पब्लिक स्कूलमध्ये झाले. पदवीसाठी तिने पशुवैद्यकीय क्षेत्राचा अभ्यास केला. हे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर तिने युपीएससी परीक्षा देण्याचे ठरवले. त्यासाठी ती अडीच वर्षांपासून चंदीगडमध्ये युपीएससीच्या परीक्षेची तयारी करत होती.
पशुवैद्यकीय शिक्षण घेतानाच तरुणाला काहीतरी वेगळं करण्याची जिद्द होती. अशा स्थितीत तिने पशुवैद्यकशास्त्र हे क्षेत्र सोडले आणि चंदीगडमध्ये यूपीएससी कोचिंग घेण्यास सुरुवात केली आणि पहिल्याच प्रयत्नात परीक्षा उत्तीर्ण झाली. या संपूर्ण प्रवासात सुरुवातीला अडथळे निर्माण झाले होते, मात्र परीक्षेच्या तयारीत तिच्या पालकांचा आणि कुटुंबीयांचा पूर्ण पाठिंबा होता.लहानपणापासून तरुणाला मोठ्या पदावर पाहण्याची इच्छा होती. त्याची मनातील इच्छा पूर्ण झाली आहे.