---Advertisement---

अनेकवेळा अपयश आले; तरीही खचल्या नाही, जिद्दीने तस्कीन खानने क्रॅक केली UPSC परीक्षा

By Chetan Patil

Published On:

---Advertisement---

आयुष्यात काही करायचे ठरवले की त्यासाठी अडचणी येतातच, परंतु त्या अडचणीतून मार्ग काढावा लागतो. अनेकदा त्यासाठी प्रचंड मेहनतही करावे लागते व अपयशालाही तोंड द्यावे लागते. परंतु जो हा प्रवास पूर्ण करतो तो आयुष्यात नक्कीच यशाचे उंच शिखर गाठतो. अशाच अथांग मेहनतीने अवघड परिस्थितीत मार्ग काढत तस्कीन खान या आयुष्यात यशस्वी झाल्या आहेत.

लहानपणापासून आपण अनेक स्वप्न बघत असतो, ते करिअर विषयी असो की भविष्यात जगणार असलेल्या आयुष्याविषयी. ते वेळेनुसार किंवा वयानुसार बदलत असतात. असाच काहीसा प्रकार तस्किन खान यांच्या बाबतीतही घडला. त्यांनी आपली स्वप्न पूर्ण करण्यासाठी अनेक अडचणींचा सामना केला परंतु या अडचणींचा सामना करत असताना त्या कधीच डगमगल्या नाही, त्यांनी ठामपणे येणाऱ्या प्रत्येक अडचणींचा सामना केला आहे.

समोर आलेल्या मीडिया रिपोर्टनुसार द स्किन खान यांना मेडिकल मध्ये करिअर करायचे होते त्यासाठी त्यांनी मेहनतीने नेटची परीक्षा देखील दिली होती. परंतु त्यासाठी लागणारा खर्च पेलला जाणार नसल्याने मेडिकल फिल्डमध्ये करिअर न करण्याचा निर्णय त्यांनी घेतला व हे स्वप्न त्यांचे अपूर्णाच राहिले. त्यानंतर त्यांनी मॉडलिंग करण्याचा निर्णय घेतला व त्या प्रोफेशनल मॉडल देखील होत्या. त्याचबरोबर तस्किन या बास्केटबॉल चॅम्पियन देखील होत्या त्या नॅशनल लेवलला डिबेटरदेखील होत्या. 2016 17 मध्ये त्यांनी मिस उत्तराखंड आणि मिस देहरादून किताब पटकवला आहे.

इतके सगळे करून देखील काहीतरी अपूर्ण असल्याची जाणीव त्यांना होत होती. यामध्येच त्यांनी आयएएस बनण्याचा निर्णय घेतला. तस्किन खान यांना यूपीएससी परीक्षेमध्ये तीनदा अपयश पत्करावे लागले. परंतु 2022 मध्ये त्यांनी 636 रँक मिळवत यूपीएससी परीक्षा क्रॅक केली, व त्या आयएएस ऑफिसर झाल्या.

Join WhatsApp Group

Join Now

Join Telegram Channel

Join Now

Related Posts