---Advertisement---

वयाच्या अवघ्या २१ व्या वर्षी यूपीएससी परीक्षा पास; वाचा विदुषी सिंगचा प्रेरणादायी प्रवास

By Chetan Patil

Published On:

---Advertisement---

UPSC Success Story : प्रयत्नार्थी परमेश्वर असे अनेकांना म्हणताना आपण ऐकले असेल. याचा अर्थ असा की प्रयत्न केल्याने परमेश्वरही मिळतो. एखादी गोष्ट करायचे ठरवले की त्यासाठी प्रयत्न मेहनत आणि सातत्य हे अत्यंत महत्त्वाचे असते. आपल्या देशात अनेक विद्यार्थी हे स्पर्धा परीक्षांची तयारी करतात परंतु त्यामध्ये सगळेच यशस्वी होतात असे नाही. अनेकांना अनेक वेळा अपयशाला सामोरे जावे लागते परंतु खचून न जाता जिद्दीने सातत्याने केलेल्या मेहनतीच्या जोरावर आपण अपयशाचे रूपांतर यशात करू शकतो. अशाच यूपीएससी सारख्या अवघड मानल्या जाणाऱ्या परीक्षेत विदुषी सिंग यांनी यश मिळवले आहे.

विदुषी सिंग या मूळच्या अयोध्येच्या परंतु विदुषी यांचा जन्म जोधपूर येथे झाला. यांनी लहानपणापासूनच भविष्यात काय करायचे हे निश्चित केले होते. व त्या त्यासाठी मेहनत देखील घेत होत्या. विदुषी यांनी कॉलेजमध्ये असतानाच एनसीआरटी आणि इतर सगळी पुस्तके वाचून अभ्यासाचा मूलभूत पाया मजबूत केला होता. व कोणत्याही कोचिंग क्लासेस शिवाय स्व अभ्यासाने त्यांनी यूपीएससीची परीक्षा दिली.

या परीक्षेत त्या उत्तीर्ण झाल्या व 13वी रँक त्यांनी मिळवली होती. 13वी रँक मिळाली असून देखिल त्यांनी आयएएस ऐवजी आयएफएस ऑफिसर व्हायचे निश्चित केले. कारण भारतीय परराष्ट्र सेवेत काम करण्याचे स्वप्न त्यांच्या आजोबांची होते हेच स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्यांनी आयएफएस ऑफिसर व्हायचे ठरवले. या पद्धतीने विदेशी सिंग यांनी कोचिंग क्लासेस शिवाय वयाच्या 21व्या वर्षी आयएफएस अधिकारी म्हणून कार्यरत आहेत.

Join WhatsApp Group

Join Now

Join Telegram Channel

Join Now

Related Posts