⁠
Inspirational

घरच्या घरी अभ्यास करून भरपूर गुणांसह कस्तुरी बनली IAS !

UPSC Success Story युपीएससीद्वारे घेतल्या जाणाऱ्या नागरी सेवा परीक्षेसाठी खूप चिकाटी, दृढनिश्चय आणि वर्षांची तयारी आवश्यक असते. युपीएससी अभ्यासक्रमात स्मार्ट अभ्यास पद्धतीचा वापर करून केला पाहिजे. यात यशस्वी होण्यासाठी हजारो इच्छुक सर्वोत्तम आणि सर्वात लोकप्रिय कोचिंग संस्थांमध्ये कोचिंगसाठी लाखो रुपये खर्च करतात. अनेक विद्यार्थी वर्षानुवर्षे तयारी करून आणि कोचिंग इन्स्टिट्यूटमध्ये जाऊनही सिव्हिल सर्व्हिसेस परीक्षेत अपयशी ठरतात. ओडिशाच्या आयएएस कस्तुरी पांडा यांनी कोणत्याही प्रशिक्षणाशिवाय ही परीक्षा उत्तीर्ण केली आहे.

हा कित्येक जणांसमोर नवा आदर्श आहे.तिने AIR-६७ रॅंक मिळवून राज्याचा नावलौकिक मिळवला.तिचे‌ शालेय शिक्षण हे डीएव्ही पब्लिक स्कूल, चंद्रशेखरपूर, भुवनेश्वर, ओडिशा येथे झाले. पुढे, तिने एनआयटी राउरकेलामधून संगणकात बीटेक पूर्ण केल्यानंतर यूपीएससीची तयारी करण्याचा निर्णय घेतला.

यासाठी ती इयत्ता नववी ते बारावीपर्यंतच्या मूलभूत गोष्टींचा सखोल अभ्यास करायची. तिने हा सारा घरीच अभ्यास केला दररोज स्व-अभ्यास, लेखन आणि सराव यावर अधिक लक्ष केंद्रित केले. १०० किंवा त्याहून अधिक गुणांसाठी ९०-९४ प्रश्न दोन तासांत पूर्ण करण्याची रेकॉर्ड आहे.

यासाठी तिने बारकाईने अभ्यास, कठोर परिश्रम आणि दृढनिश्चय होता. त्यामुळेच, कस्तुरीने नागरी सेवा परीक्षेत (UPSC, CSE) लेखी परीक्षेत एकूण १००६ गुण, ८२२ गुण मिळाले आणि कोणत्याही प्रशिक्षणाशिवाय ती आयएएस अधिकारी पदापर्यंत पोहोचली.

Related Articles

Back to top button