ग्रामीण भागातील पार्श्वभूमी असूनही कुणाल पाटील झाला IFS अधिकारी!
UPSC Success Story : ग्रामीण भागातील मुलगा उच्च पदावर जातो तेव्हा अनेकांसाठी ती प्रेरणादायी बाब असते. असेच, जळगाव जिल्ह्यातील पाचोरा तालुक्याच्या सामनेर गावातील तरुणाने युपीएससी परीक्षेत यश मिळवले आहे. कुणाल नाना पाटीलचे. कुणालचे वडील हे माजी सैनिक असून ते सध्या इंडस्ट्रियल कोर्टात वॉचमन आहेत. तर आई गृहिणी आहे. तसेच भाऊ तुषार नाना पाटील हा नाशिक येथे सह्याद्री फार्म्समध्ये व्यवस्थापक तर वहिनी कॅनरा बँकमध्ये शाखा व्यवस्थापक या पदावर कार्यरत आहेत. घरचे शैक्षणिक वातावरण असल्याने त्याला देखील शिक्षणासाठी आणि स्पर्धा परीक्षेची तयारी करायला पाठिंबा मिळाला.
त्याचे दहावीपर्यंचे शिक्षण सामनेर येथील महात्मा गांधी विद्यालयात झाले. तर बारावीपर्यंतचे शिक्षण त्याने जळगावातील मू.जे. कॉलेजमधून पूर्ण केले. यानंतर त्याने नाशिकमधील केके वाघ कॉलेजमधून बीएससी मायक्रोबायोलॉजीमध्ये पदवीचे शिक्षण घेतले. त्यानंतर पदव्युत्तर शिक्षण घेण्यासाठी त्याने पुणे गाठले. पुण्यातील फर्ग्युसन – कॉलेजमधून पर्यावरण विज्ञान या विषयात मास्टर्स पूर्ण केले. याच दरम्यान त्याला स्पर्धा परीक्षेची आवड निर्माण झाली. युपीएससीच्या तयारीतील अभ्यासाचा त्याने जास्तीत जास्त सराव केले. अनेक आव्हान पार केले.
यानंतर मुख्य परिक्षेसाठी सुरूवातीला पुरेशी तयारी नसताना देखील त्यासाठी अवघ्या कमी कालवधीत तयारी केली. विशेषतः युपीएससीत मुलाखतीसाठी पहिल्यांदाच पात्र ठरल्याने ते मोठे आव्हान होते. यासाठी त्याने जास्तीत जास्त मॉक टेस्ट देत मुलाखत दिली. पुढे, त्याने २०१९ साली दिल्लीत जाऊन स्पर्धा परिक्षेची तयारी सुरू केली. युपीएससी २०२३ साठी पूर्व परिक्षेत १०४ गुण मिळाले. तो मुख्य परिक्षेसाठी पात्र ठरला. यानंतर मुख्य परिक्षेत ६४९ गुण प्राप्त करत तो मुलाखतीसाठी पात्र ठरला. अखेर, या मेहनतीला फळ मिळाले. युपीएससी २०२३ द्वारे भारतीय वन सेवेत (Indian Forest Service-IFS) निवड झाली आहे. भारतभरातून त्याने १२१ रॅंक मिळवली आहे.