⁠  ⁠

युट्यूबची मदत घेत रात्र-दिवस अभ्यास केला, पहिल्याच प्रयत्नात बनली IAS अधिकारी

Chetan Patil
By Chetan Patil 1 Min Read
1 Min Read

UPSC Success Story : आपल्या आयुष्यात काही गोष्टी ह्या अनुभवातून शिकायला मिळतात तर काही इतरांकडून मिळालेल्या प्रेरणेतून अनुभवता येतात‌. लघिमा तिवारी असे त्या आयएएस महिला अधिकारीचे लघिमा तिवारी राजस्थानच्या अलवर येथील रहिवासी. तिने यूट्यूब सारख्या ॲपचा अभ्यासासाठी वापर करून घेतला. ती यूट्यूबवर यूपीएससी परीक्षेत टॉप केलेल्या अनेक उमेदवारांच्या मुलाखती ऐकायची. त्यातून तिला बरेच ज्ञान मिळाले. तिला या व्हिडीओतून चालू घडामोडी व अभ्यासक्रमातील इतर भागांची माहिती मिळाली .

लघिमा यांनी दिल्ली टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटी मधील इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन इंजिनीअरिंग पदवी मिळवली आहे. २०२१ मध्ये पदवीचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी यूपीएससी सिव्हिल सर्व्हिसेस परीक्षेची तयारी सुरू केली. तिने स्वयं-अध्ययनावर अधिक भर दिला. या परीक्षेच्या अभ्यासासाठी त्यांनी युट्यूबची मदत घेतली आणि रात्र-दिवस अभ्यास केला. तिने या अभ्यासात नेहमी सातत्य ठेवले.

प्रत्येक परीक्षेच्या अगोदर अभ्यासाचे वेळापत्रक बनवून त्यानुसारच ती अभ्यास करायची. ती पदवीची शेवटी परीक्षा संपताच उमेदवारांनी वेळ वाया न घालवता, मुख्य परीक्षेची तयारी सुरू केली.यामुळेच तिने पहिल्याच प्रयत्नात यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण करत संपूर्ण भारतात १९ वा क्रमांक मिळवला आणि ती आय.ए.एस अधिकारी झाली.

Share This Article