कापड दुकानदाराचा मुलगा झाला कलेक्टर; आईचे स्वप्न केले पूर्ण!
UPSC Success Story ओंकारचे वडील हे कापड दुकानदार असल्याने लहानपणी संघर्षमय जीवन जगत कुटूंब चालवले. पण त्यांच्या लेकाने आईचे स्वप्न पूर्ण केले. ओंकार गुंडगेच्या (Omkar Gundage) आईला स्वतःला कलेक्टर व्हायचं होते. परिस्थितीमुळे बनता आले नाही. पण आज त्यांचे स्वप्न मुलाने पूर्ण केल्याने सगळ्यांना खूप आनंद झाला. दहिवडीचा सुपुत्र ओंकार गुंडगे याने केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत देशात ३८० वा क्रमांक मिळवून यशाला गवसणी घातली.
ओंकारचे माध्यमिक शिक्षण मेरीमाता इंग्लिश स्कूल मीडियम म्हसवड येथे झाले. उच्च माध्यमिक शिक्षण रुईया कॉलेज मुंबई येथे झाले. तर, आयएलएस लॉ कॉलेज पुणे येथून त्याने बीएसएलएलएलबी ही पदवी २०१७ साली मिळवली. या पदवीच्या तिसऱ्या वर्षी तो विद्यापीठात प्रथम आला होता.
त्यामुळे, लहानपणापासून अभ्यासाची गोडी आणि हुशार असल्याने त्याने स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करण्याचा निर्णय घेतला. यासाठी दररोज नित्यनेमाने वाचन, ७-८ तास अभ्यास व व्यायाम हे त्याने दैनंदिन शेड्युल होते.तो पूर्व परीक्षा पास झाल्यावर मुख्य परीक्षेच्या अभ्यासासाठी दिल्ली येथे गेला.
चार प्रयत्नात पूर्व परीक्षा पास होऊनही मुख्य परीक्षेत त्याला अपयशाला सामोरे जावे लागले. मात्र, पाचव्या प्रयत्नात मुलाखतीसाठी पात्र होऊन देशात ३८०वा आला.या यशाने ओंकारने आमच्या कुटुंबाची वेगळी ओळख निर्माण केली आहे. प्रामाणिकपणे देशसेवा करून तो आमची मान उंचावेल.