---Advertisement---

आई वडिलांच्या कष्टाला फळ! प्रतिकूल परिस्थितीत प्रणालीने मिळवलं सीएपीएफ एसी परीक्षेत यश

By Chetan Patil

Published On:

---Advertisement---

UPSC Success Story : आपल्या मुलीने उच्च शिक्षण घ्यावे आणि सरकारी नोकरी मिळवावी ही इच्छा उराशी बाळगून प्रणालीच्या आई – वडिलांनी तिला घडवली….नुसतं घडवले नाहीतर अधिकारी होण्यासाठी पाठिंबा दिला. प्रणाली रमेश पाटील ही हातकणंगले तालुक्यातील वडगांव या भागातील लेक. प्रणालीचे वडील रमेश पाटील हे गावोगावी जाऊन घरगुती साहित्याची विक्री करतात. तर आई घरकाम करते.

तिचे शालेय शिक्षण हे मराठी माध्यमातून वाठार येथील जिल्हा परिषदेच्या कन्या विद्या मंदीर शाळेत झाले. तर, माध्यमिक शिक्षण किणी हायस्कूल व बारावीपर्यतचे शिक्षण कोल्हापुरातील स्वामी विवेकानंद महाविद्यालयात झाले. युपीएससीचे ध्येय ठेवून प्रणालीने पुण्यातील सिध्दी विनायक महाविद्यालयात बी. ए. ची पदवी तर भूगोल विषयातून एम.ए.ची पदवी सर परशुराम भाऊ महाविद्यालयात घेतली. किणी हायस्कूलमध्ये असतानाच युपीएससीतून अधिकारी व्हायचे स्वप्न पाहिले. त्यानुसार पुढील शिक्षण घेतले

---Advertisement---

दिल्लीला जाऊन क्लास करण्यासाठी अनेक मार्गदर्शकांनी साथ दिली. यामुळेच तिला अभ्यास करण्यासाठी अधिक बळ मिळाले. तिने देखील या सगळ्याची जाणीव ठेवून मेहनतीने अभ्यास केला. यामुळेच, केंद्रीय लोकसेवा आयोगा मार्फत घेण्यात आलेल्या सीएपीएफ एसी परीक्षेत यश संपादन केले आहे.

Join WhatsApp Group

Join Now

Join Telegram Channel

Join Now

Related Posts