UPSC IRS Success Story : आपल्याला कोणत्याही परिस्थितीवर मात करून यशाची पायरी गाठता आली पाहिजे. हेच नागपूर जिल्हातील नरखेडच्या प्रतीक कोरडे यांनी दाखवून दिले आहे. प्रतीक हा मूळचा नागपूर जिल्ह्यातील भिष्णूर या लहानशा खेड्यातला लेक…त्याचे वडील भारतीय सैन्यात देशसेवा करत होते.
वडील देशसेवेसाठी बॉर्डरवर असताना त्याच्या आईने आम्हा तीनही मुलांचा सांभाळ केला. २००१ मध्ये वडील सैन्य सेवेच्या पदावरून निवृत्त झाल्यावर त्यांनी काही काळ शेती केली तर २०१२ मध्येसिक्युरिटी डिपार्टमेंट मध्ये देखील काम केले,तर आई कुटुंब सांभाळत होत्या. त्यांनीच तिन्ही मुलांना चांगले संस्कार देऊन घडवलं.त्याची एक बहीण ही पोलीस उपनिरीक्षक म्हणून कार्यरत आहे.
त्यानंतर मधली बहीण प्रियंका ही वैद्यकीय क्षेत्रात कार्यरत आहे. प्रतिकला पण सैन्यात सामील व्हायचे होते. पण त्याने युपीएससीचा मार्ग निवडला.त्याचे प्राथमिक शिक्षण भिष्णूर येथेच जिल्हा परिषदेच्या शाळेतच झालं. माध्यमिक शिक्षण तालुक्याचे ठिकाण नरखेड येथे तर उच्च माध्यमिक शिक्षण नागपुरातील पटवर्धन हायस्कूलमध्ये घेतले. बारावीत चांगले गुण मिळवणाऱ्या प्रतिकचं वडिलांप्रमाणेच सैन्यात जायचं स्वप्न होतं. पुढं त्याने सर परशुराम भाऊ कॉलेज येथे मास्टर्स ऑफ आर्ट इन इंग्लिश लिटरेचर हे शिक्षण पूर्ण केले. हे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्याने स्पर्धा परीक्षेची तयारी करायला सुरुवात केली. पण कोरोनाचा काळ आला. यात परीक्षा आणि भरती प्रक्रिया होत नव्हती. कोरोना काळात परीक्षा देता आली नाही.
मात्र, त्याने या काळात अभ्यास सुरूच ठेवला. २०२२च्या युपीएससी परीक्षेत प्रतिकनं यशाला गवसणी घातली. केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत देशात ६३८वी रँक मिळावली आणि आय.आर.एस हे पद मिळवले.