---Advertisement---

वस्तीतला होतकरू मुलगा ते सरकारी अधिकारी; वाचा सिध्दार्थ भांगेंची यशोगाथा !

By Chetan Patil

Published On:

---Advertisement---

UPSC Success Story : जिद्द, यश आणि संयम या त्रिसूत्रीच्या जोरावर आपल्याला कोणतेही यश गाठता येते. हेच सिद्धार्थ किशोर भांगे याने करून दाखवले आहे. एकदम वस्तीमधले लहानसे घर..वडिलांचा भाजी विक्रेत्याचा व्यवसाय…खडतर प्रवास असे असून कसे यश गाठले? यामागे एकमेव मार्ग असा की तो जिद्द….सिद्धार्थ हा पुण्यातील खराडी वस्तीमध्ये राहतो.

काही वर्षांपूर्वी त्याचे वडील रिक्षा चालवत असतं. पण त्यामधून उत्पन्न मिळणं कमी झालं. त्यामुळे त्यांनी नोकरी करण्याचा प्रयत्न केला. पण, त्यांना यश मिळालं नाही. त्यांनी घर चालवण्यासाठी कोरोना काळात भाजी विक्री केली. पण त्यांनी मुलांच्या शिक्षणासाठी प्रोत्साहन दिले.सिद्धार्थने राज्यशास्त्र विषयातून पुण्यातील वाडिया कॉलेजमधून पदवी घेतली आहे. करोना काळात अभ्यासाची तयारी सुरु केली .

सिध्दार्थ देखील वाटायचे की वडील आपल्या इतके कष्ट घेत आहेत. तर त्यांच्यासाठी मलाही काही तरी केलं पाहिजे. ही माझीही जबाबादारी आहे. म्हणून त्याने आपल्या अभ्यासावर बरीच मेहनत घेतली. दररोज वाचन,लेखन सराव यावर भर दिला. अभ्यासक्रम पूर्णपणे समजून घेऊन त्यावर काम केले. पण या प्रवासात त्याला पहिल्या प्रयत्नात अपयश आले. पण दुसऱ्या प्रयत्नात त्याला यश मिळाले.

ही परीक्षा पास होऊन सरकारी अधिकारी होण्याचं लाखो तरुणांचं स्वप्न असतं सिध्दार्थने पूर्ण करून दाखवले. आता जे मिळेल ते पद स्वीकारून पुन्हा परीक्षेचा अभ्यास सुरू‌ करणार आणि पुढे ‘आयएएस’ होण्यासाठीही प्रयत्न करणार आहे.पुण्यातील भाजी विक्रेत्याच्या मुलाने मिळवलेलं हे यश अनेकांसाठी प्रेरणादायी आहे.

Join WhatsApp Group

Join Now

Join Telegram Channel

Join Now

Related Posts