⁠
Inspirational

स्पर्धा परीक्षेत तब्बल 35 वेळा अपयश ; मात्र जिद्दीने आधी ‘IPS’ आणि मग ‘IAS’ झाले

UPSC Success Story स्पर्धा परीक्षा म्हटलं की कधी यश तर कधी अपयश हे आलेच.पण IAS विजय वर्धन यांना सगळ्या या प्रवासात ३५ वेळा अपयश आले. पण ते हरून गेले नाहीत की त्यांनी पळवाट शोधली नाही. शासकीय सेवा व विविध स्पर्धा परीक्षेत आलेले हे अपयश स्वीकारले. जोमाने अभ्यासाला लागले. अखेर ते आयपीएस आणि मग आयएएस झाले. नक्की वाचा त्यांची ही प्रेरणादायी कहाणी…

विजय वर्धन हे मूळचे हरियाणाचे. त्यांचे शालेय शिक्षण हरियाणातील सिरसा येथे झाले. पुढे त्यांनी हिस्सार येथून इलेक्ट्रॉनिक्स इंजिनीअरिंग केले. इंजिनीअरिंगमध्ये पदवी मिळवल्यानंतर यूपीएससीचा अभ्यास करण्यासाठी ते दिल्लीला गेले. या परीक्षेची तयारी करीत असताना त्यांनी हरियाणा पीसीएस, यूपीपीएससी, एसएससी आणि सीजीएल या आणि अशा अनेक शासकीय सेवेतील जवळपास ३५ परीक्षा दिल्या.

आता कित्येक विद्यार्थी तर बारावीपासूनच स्पर्धा परीक्षांची तयारी करतात. स्पर्धा परीक्षांमधून मोठाल्या पोस्ट मिळाव्या, आयपीएस, आयएएस सारख्या पदांवर पोहोचता यावे यासाठी तरुणाई रात्रंदिवस मेहनत करत असतात. यात कधी अपयशालाही सामोरे जावे लागते. त्यामुळे काहीजण खचतात आणि या स्पर्धा परीक्षांना कायमचा रामराम करतात. पण आयएएस विजय वर्धन यांनी ३५ वेळा विविध शासकीय सेवांच्या परीक्षांमध्ये अपयश आले. पण त्यांनी हार मानली नाही. अतोनात प्रयत्न करून ते देशातील सर्वात अवघड समजली जाणारी ‘यूपीएससी’ ही परीक्षा पास झालेच.

शिवाय एकदा नाही तर दोनदा या परीक्षेत उत्तीर्ण होऊन ते अनुक्रमे ‘आयपीएस’ आणि मग ‘आयएएस’ झाले.पण ‘आयपीएस’ सारखी पोस्ट मिळूनही ते खुश नव्हते, कारण त्यांचे ध्येय काही वेगळे होते. म्हणून त्यांनी २०२१ मध्ये पुन्हा यूपीएससी परीक्षा दिली आणि ते ‘आयएएस’ झाले. इतके अपयश मिळूनही त्यांनी आपले ध्येय गाठले.२०१८ मध्ये ही परीक्षा उत्तीर्ण केली आणि १०४ रँक मिळवत ते ‘आयपीएस’ झाले. या संपूर्ण प्रवासात ध्येयावर लक्ष केंद्रित केले आणि अभ्यास करत राहिलात तर यशाचा मार्ग मोकळा होतो, हे विसरून चालणार नाही.

मित्रांनो, तुम्हीच तुमचे सर्वोत्तम मागर्दर्शक आहात. त्यामुळे जेव्हा एखादा निर्णय घेता तेव्हा त्यावर ठाम राहा आणि तुमच्या क्षमतेवर विश्वास ठेवा. तुम्हाला यश हे नक्कीच मिळेल.कितीही अपयश आले तरी मागे फिरू नका.

Related Articles

Back to top button