---Advertisement---

महाराष्ट्र वनविभागात नोकरी करण्याची सुवर्णसंधी; ५०००० रुपये पगार मिळेल

By Chetan Patil

Published On:

---Advertisement---

Vanvibagh Recruitment 2025 : महाराष्ट्र वनविभागामार्फत काही रिक्त पदांसाठी भरती निघालीय. यासाठीची जाहिरात प्रसिद्ध झालीय. त्यानुसार पात्र उमेदवारांना खाली दिलेल्या पत्त्यावर अर्ज करावा लागणार आहे.

वनविभागाचे अधिनस्त ११ वनपरिक्षेत्रामध्ये ही भरती करण्यात येणार आहे. यासाठी पात्र उमेदवारांना या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख १५ जानेवारी २०२५ आहे. इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करावेत.

आवश्यक पात्रता :
वनविभागात वैद्यकीय अधिकारी म्हणून भरती सुरु आहे.या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी Bachlor Of Veterinary Science/ B.V.Sc पदवी प्राप्त केलेली असावी. याचसोबत उमेदवार हा शारीरिक, मानसिकदृष्ट्या सक्षम असावा.

पगार आणि वयाची अट ;
वनविभागातील या नोकरीसाठी २५ ते ४५ वयोगटातील उमेदवार अर्ज करु शकतात. या नोकरीसाठी निवड झालेल्या उमेदवाराला ५०,००० रुपये पगार दिला जाणार आहे.

इच्छुक उमेदवारांनी ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.या नोकरीसाठी उमेदवारांची भरती कोल्हापूर येथे होणार आहे. या नोकरीसाठी उमेदवारांची भरती कंत्राटी पद्धतीने करण्यात येणार आहे.पशुवैद्यकीय अधिकारी पदासाठी निवड झालेल्या उमेदवाराला त्याच्यावर सोपवलेले काम करणे गरजेचे आहे.

इथे करावा लागणार अर्ज?
या नोकरीसाठी उमेदवारांनी अर्ज उपवनसंरक्षक, कोल्हापूर वनविभाग कार्यालय, वनवर्धन इमारत, ग्राउंड फ्लोर, पोस्ट ऑफिसर समोर, ताराबाई पार्क येथे पाठवायचा आहे.

Join WhatsApp Group

Join Now

Join Telegram Channel

Join Now