VVCMC Recruitment 2023 वसई विरार महानगरपालिकामध्ये विविध पदे भरण्यासाठी भरती निघाली असून यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. पदानुसार इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज पाठवावा. निवड ही मुलाखतीद्वारे केली जाणार असून मुलाखतीसाठी हजर राहावे. मुलाखत दिनांक 07 जुन 2023 आहे.
एकूण रिक्त जागा : 22
रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :
1) वैद्यकीय अधिकारी स्त्रीरोगतज्ज्ञ- 04
शैक्षणिक पात्रता : 01) मान्यताप्राप्त विद्यापीठाची एम.डी. (स्त्री व प्रसुतिरोगशास्र) किंवा एम.बी.बी.एस., डी.जी.ओ. किंवा समकक्ष पदव्युत्तर पदवी उत्तीर्ण. 02 ) शासकीय / निमशासकीय / खाजगी रुग्ण्यालयातील संबंधित विषयातील ३ वर्षांचा अनुभव. 03) महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलची / इंडियन मेडिकल कौन्सिलकडील नोंदणी प्रमाणपत्र.
2) वैद्यकीय अधिकारी शल्यचिकित्सक (पूर्णवेळ) -03
शैक्षणिक पात्रता : 01) मान्यताप्राप्त विद्यापीठाची एम.एस. (शल्यचिकित्सक शास्त्र) किंवा समकक्ष पदव्युत्तर पदवी उत्तीर्ण. 02) शासकीय / निमशासकीय / खाजगी रुग्ण्यालयातील संबंधित विषयातील ३ वर्षांचा अनुभव. 03) महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलची / इंडियन मेडिकल कौन्सिलकडील नोंदणी प्रमाणपत्र.
IBPS RRB : विविध पदांच्या 8600+ जागांवर भरती
3) वैद्यकीय अधिकारी एम.बी.बी.एस. -15
शैक्षणिक पात्रता : 01) मान्यताप्राप्त विद्यापीठाची एम.बी.बी.एस. पदवी उत्तीर्ण. 02) शासकीय / निमशासकीय / खाजगी रुग्ण्यालयातील संबंधित विषयातील ३ वर्षांचा अनुभव. 03) महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलची / इंडियन मेडिकल कौन्सिलकडील नोंदणी प्रमाणपत्र.
वयाची अट : 40 वर्षे [मागासवर्गीय प्रवर्ग – 05 वर्षे सूट]
परीक्षा फी : फी नाही
पगार : 75,000/- रुपये ते 85,000/- रुपये.
नोकरी ठिकाण : वसई विरार (महाराष्ट्र)
निवड पद्धत : मुलाखतीद्वारे
अर्ज पाठविण्याचा पत्ता : वसई-विरार शहर महानगरपालिका, वैद्यकीय आरोग्य विभाग, चोथा माळा, प्रभाग समिती सी कार्यालय, विरार (पूर्व).