वेस्टर्न कोलफील्ड्स लिमिटेड (डब्ल्यूसीएल) ने मायनिंग सिरदार आणि सर्व्हेअर (मायनिंग) पदासाठी भरतीची अधिसूचना जारी केली आहे. यासाठी एकूण 211 रिक्त पदांसाठी अर्ज करण्याची संधी आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार westcoal.in च्या अधिकृत वेबसाइटद्वारे ऑनलाइन अर्ज करू शकतात. ऑनलाईन अर्ज प्रक्रिया 21 ऑक्टोबर 2021 पासून सुरू होईल, इच्छुक उमेदवार 20 नोव्हेंबर 2021 रोजी किंवा त्यापूर्वी अर्ज भरू शकतील.
एकूण जागा : २११
पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :
1) माइनिंग सिरदार T&S ग्रुप ‘C’- 167 पदे
शैक्षणिक पात्रता: (i) 10वी उत्तीर्ण (ii) माइनिंग सिरदारशिप प्रमाणपत्र किंवा माइनिंग इंजिनिअरिंग डिप्लोमा+ओवरमन प्रमाणपत्र (iii) गॅस परिक्षण प्रमाणपत्र (iv) प्रथमोपचार प्रमाणपत्र
2) सर्व्हेअर (माइनिंग) T&S ग्रुप ‘B’ – 44 पदे
शैक्षणिक पात्रता: 10वी उत्तीर्ण/+सर्व्हेअर प्रमाणपत्र किंवा खाण / खाण सर्वेक्षण इंजिनिअरिंग डिप्लोमा+सर्व्हेअर प्रमाणपत्र.
वयाची अट:
अर्जदारांचे वय 11 ऑक्टोबर 2021 रोजी किमान 18 वर्षे आणि कमाल 30 वर्षे असावे. तथापि, आरक्षित प्रवर्गातील उमेदवारांसाठी श्रेणीनिहाय वरच्या वयोमर्यादेत शिथिलता असेल.
नोकरी ठिकाण: महाराष्ट्र & मध्य प्रदेश
परीक्षा फी : फी नाही
किती पगार मिळेल?:
माइनिंग सिरदार – रु 31,852 इतका पगार मिळेल.
सर्व्हेअर (माइनिंग) – 34,391 रुपयांसह दिला जाईल.
निवड निकष:
निवड परीक्षेतील उमेदवाराच्या सापेक्ष कामगिरीवर आधारित असेल. मोड, ठिकाण आणि परीक्षेची तारीख ईमेलद्वारे शॉर्टलिस्ट केलेल्या उमेदवारांना कळवली जाईल.
अर्ज पद्धती : ऑनलाईन
अर्ज सुरु होण्याची तारीख : २१ ऑक्टोबर २०२१
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 20 नोव्हेंबर 2021 (05:00 PM)
जाहिरात (Notification) पाहण्यासाठी : येथे क्लिक करा
ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा