⁠  ⁠

Railway Bharti : रेल्वेत ‘या’ पदांवर परीक्षेशिवाय नोकरी मिळविण्याची संधी.. 10वी पाससाठी मोठी संधी

Chetan Patil
By Chetan Patil 1 Min Read
1 Min Read

West Central Railway Recruitment 2022 : भारतीय रेल्वेमध्ये सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी चांगली संधी आहे. यासाठी, भारतीय रेल्वेने पश्चिम मध्य रेल्वे (WCR) अंतर्गत शिकाऊ (Railway Bharti 2022) पदांवर भरतीसाठी अर्ज मागवले आहेत. एकूण २५२१ जागांसाठी ही भरती होणार असून यासाठी पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा असून अर्ज करण्याची शेवटची तारीख १७ डिसेंबर २०२२ आहे.

एकूण जागा : २५२१

रिक्त पदाचे नाव: अप्रेंटिस (प्रशिक्षणार्थी)

रिक्त पदांचा तपशील
JBP विभाग – 884
बीपीएल विभाग – 614
कोटा विभाग – 685
WRS कोटा – 160
CRWS BPL- 158
मुख्यालय JBP- 20

शैक्षणिक पात्रता: (i) 50% गुणांसह 10वी उत्तीर्ण (ii) संबंधित ट्रेड मध्ये ITI
वयाची अट: 17 नोव्हेंबर 2022 रोजी 15 ते 24 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
परीक्षा फी : 100/- [SC/ST/PWD/महिला: फी नाही]

निवड प्रक्रिया :
निवड 10वी किंवा त्यांच्या समकक्ष परीक्षा आणि ITI/ट्रेड गुणांच्या आधारावर केली जाईल.
रेल्वे व्यापार-निहाय/विभागनिहाय/युनिट-निहाय/समुदायनिहाय गुणवत्ता यादी तयार करेल.
शॉर्टलिस्ट केलेल्या उमेदवारांना डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन (DV) साठी हजर राहावे लागेल.

नोकरी ठिकाण: पश्चिम-मध्य रेल्वे
अर्ज पद्धती : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 17 डिसेंबर 2022
अधिकृत संकेतस्थळ : www.wcr.indianrailways.gov.in
जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा
ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा

Share This Article