---Advertisement---

महाराष्ट्र महिला व बालविकास विभागांतर्गत 18,882 पदांची भरती होणार

By Chetan Patil

Updated On:

anganwadi bharti (3)
---Advertisement---

महिला व बालविकास विभागांतर्गत एकात्मिक बालविकास सेवा योजनेअंतर्गत 5639 अंगणवाडी सेविका व 13,243 अंगणवाडी मदतनीस अशा एकूण 18,882 पदांची भरती करण्यात येणार आहे.

या विभागातील विविध रिक्त पदांची भरती करण्याबाबत आज मंत्रालयातील दालनात मंत्री अदिती तटकरे (Minister Aditi Tatkare) यांच्या उपस्थितीत बैठक घेण्यात आली.

14 फेब्रुवारी ते 2 मार्च दरम्यान मुख्य सेविका पदासाठीही सरळ सेवेच्या माध्यमातून भरती होणार आहे. या भरतीच्या अनुषंगाने महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी मंत्रालयात बैठक घेतली. त्यांनी ही प्रक्रियाही पारदर्शक पद्धतीने राबवण्याबाबत उचित खबरदारी घेण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना बैठकीत दिले.

यासोबतच राज्य महिला आयोग, महिला आर्थिक विकास महामंडळ, बालकल्याण समिती, बाल न्याय मंडळातील रिक्त पदांचीही भरती प्रक्रिया लवकरात लवकर सुरु करावी अशा सूचना अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.

Join WhatsApp Group

Join Now

Join Telegram Channel

Join Now

Leave a Comment