जेव्हा गावातील मुलगा भारताचे प्रतिनिधित्व करतो, ते संपूर्ण गावासाठी अभिमानाची आणि कौतुकास्पद बाब ठरते. असाच रायगड जिल्ह्यातील रोहा या तालुक्यातील यश अशोक तेंडुलकर. याने नुकतेच राष्ट्रीय नौदल प्रशिक्षण पूर्ण केले असून त्याची भारतीय नौदलात निवड झाली आहे.यश तेंडुलकर हा नेहमीचं अभ्यासात आणि पोहण्यात अव्वल होता.
त्याने बऱ्याच वेळा गोल्ड सिल्वर ब्राँझ पदक मिळवली आहेत. आणि त्याला इंडीयन नेव्ही मधे जाण्याची इच्छा होती. आज त्याचं हे स्वप्न पूर्ण होत आहे.यशने आठवीपासूनच आर्म फोर्स मध्ये जाण्याचे स्वप्न उराशी बाळगले आणि अभ्यास केला. त्यांचे शालेय शिक्षण जे. एम.राठी स्कूलमध्ये दहावी पर्यंत शिक्षण पूर्ण झाले. त्याला दहावीमध्ये ९१ टक्के गुण प्राप्त झाले तर गणित या विषयामध्ये केले ९८ गुण मिळवून शाळेत पहिला येण्याचा बहुमान त्याने प्राप्त केला. दहावी झाल्यावर संभाजीनगरला एस.पी.आय मध्ये बारा हजार मुलांमधून ६० जणांची निवड होणार होती. यात यश देखील होता. त्याने त्यानंतर खडकवासला पुणे येथील एनडीए परीक्षा उत्तीर्ण होत आपले पुढील शिक्षण सुरु ठेवले. नुकतेच त्याने एनडीएचे खडतर प्रशिक्षण पूर्ण केले. आता तो नौदलात दाखल होणार आहे.
तीन वर्षाचं खडतर ट्रेनिंग पूर्ण झाले आहे. एक वर्षाचं नेव्ही कोचीन केरळ येथे ट्रेनिंग पूर्ण करण्यासाठी जाईल त्यानंतर यश देशाच्या सेवेत रुजू होणार आहे. त्याचा हा नक्कीच प्रेरणादायी ठरणारा आहे.यश तेंडुलकरच्या या गौरवशाली कामगिरी आणि उतुंग भरारी घेतल्याबद्दल तमाम रोहेकरांची मान अभिमानाने उंचावली आहे