⁠  ⁠

चालू घडामोडी : २० ऑक्टोबर २०१९

Tushar Bhambare
By Tushar Bhambare 2 Min Read
2 Min Read

‘तेजस’ला उशीर, प्रवाशांना पहिल्यांदाच मिळणार भरपाई

देशातील पहिली खासगी ट्रेन ‘तेजस एक्स्प्रेस’ला उशीर झाल्यामुळे प्रवाशांना भरपाई दिली जाणार आहे. एखाद्या ट्रेनला उशीर झाल्यामुळे प्रवाशांना भरपाई देण्याची ही देशातील पहिलीच वेळ आहे. आयआरसीटीसीकडून प्रवाशांना ही भरपाई दिली जाणार आहे.

भरपाईसाठी सर्व प्रवाशांच्या मोबाईल क्रमांकावर एक लिंक पाठवली आहे. या लिंकवर क्लिक करून प्रवासी भरपाईची मागणी करू शकतात.

आयआरसीटीसीनुसार, तेजस एक्स्प्रेसला एक तासांहून थोडाफार उशीर झाल्यास प्रवाशांना 100 रुपये भरपाई आणि दोन तासांहून अधिक उशीर झाल्यास 250 रुपये भरपाई मिळेल. देशात पहिल्यांदाच  एखाद्या ट्रेनला उशीर झाल्याने प्रवाशांना भरपाई मिळणार आहे.

सचिन-सेहवागच्या कामगिरीची रोहितकडून पुनरावृत्ती

वन-डे क्रिकेटमध्ये रोहित शर्माच्या नावावर ३ द्विशतकांची नोंद आहे. रोहितनं या द्विशतकासह Fantastic Four दिग्गजांमध्ये स्वतःच नाव समाविष्ठ केलं आहे. वन डे आणि कसोटीत द्विशतक झळकावणारा रोहित चौथा फलंदाज ठरला आहे. सचिन तेंडुलकर, वीरेंद्र सेहवाग आणि ख्रिस गेल यांनी अशी कामगिरी केली आहे. रोहितनं वन डे क्रिकेटमध्ये तीन द्विशतकं झळकावली आहेत.

रोहितनं आणखी एका विक्रमाची भर घातली. त्यानं प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये 7000 धावांचा पल्ला पार केला. या कामगिरीसह त्यानं ऑस्ट्रेलियाचे महान फलंदाज सर डॉन ब्रॅडमन यांच्या कसोटी क्रिकेटमधील 6996 धावांचा पल्ला ओलांडला.

कॉर्पोरेट कर घटवल्याने भारतात गुंतवणूक वाढेल

कॉर्पोरेट कर कमी करण्याच्या भारताच्या निर्णयाचे आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने स्वागत केले आहे. या निर्णयाचा भारतातील गुंतवणुकीवर सकारात्मक परिणाम होईल, असे नाणेनिधीने म्हटले आहे. 

नाणेनिधीचे संचालक (आशिया पॅसिफिक विभाग) चांगयोंग री यांनी येथे पत्रकार परिषदेत एका प्रश्नाचे उत्तर देताना सांगितले की, भारतातील गेल्या दोन तिमाहींमधील मंदी पाहता चालू आर्थिक वर्षात भारताचा विकासदर ६.१ टक्के राहण्याचा अंदाज आहे. हा दर सन २०२०मध्ये वाढून सात टक्के होऊ शकतो.

Share This Article