अॅशेस मालिकेतील तिसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यामध्ये इंग्लंडवर एक डाव आणि ४१ धावांनी विजय मिळवला. या विजयासह ऑस्ट्रेलियाने पाच सामन्यांच्या मालिकेत ३-० अशी विजयी आघाडी घेतली आहे. पाच व त्याहून अधिक सामन्यांच्या अॅशेस मालिकेमध्ये दहाव्यांदा तिसऱ्या सामन्याअखेरच मालिकेचा निकाल लागला. यांपैकी नऊवेळा ऑस्ट्रेलियाने मालिकाविजय निश्चित केला असून, इंग्लंडला केवळ १९२८-२९ च्या मालिकेत विजयी आघाडी घेता आली होती. ऑस्ट्रेलियाने वॅका स्टेडियमवर १९९१ पासून सलग आठव्यांदा इंग्लंडला पराभूत करण्यात यश मिळवले.
द ऍशेस ही इंग्लंडचा ध्वज इंग्लंड व ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया ह्या दोन देशांदरम्यान खेळली जाणारी ऐतिहासिक कसोटी क्रिकेट मालिका आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ही सर्वात जुनी व मानाची मालिका मानली जाते. सर्वात पहिली ऍशेस मालिका १८८२-८३ साली ऑस्ट्रेलियामध्ये खेळवली गेली. सध्या ऍशेस दोन वर्षातून एकदा खेळवली जाते व दोन्ही देश आलटुन पालटुन ह्या मालिकेचे आयोजन करतात. सर्वसाधारणपणे ऍशेस मालिकेत ५ कसोटी सामने असतात. जर मालिका बरोबरीत सुटली तर मागील विजयी टीमकडे ऍशेसचा चषक राहतो. ह्या मालिकेला ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे. १८८२ साली पहिल्या ऍशेस मालिकेत एकच सामना ओव्हल या मैदानावर खेळला गेला. या रोमहर्षक सामन्यात ऑस्ट्रेलिया ने पहिल्या डावात केवळ ६३ धावा केल्या. पण इंग्लंड चा संघ ही केवळ १०१ धावाच करु शकला. दुसऱ्या डावात देखील ऑस्ट्रेलिया संघ १२२ पर्यत मजल मारु शकला. अखेर इंग्लंड ला विजयासाठी केवळ ८५ धावाच हव्या होत्या. पण इंग्लंड फक्त ७८ धावाची मजल मारु शकला. त्याचे अखेरचे ४ फलंदाज केवळ २ धावांमध्ये बाद झाले. हा ऑस्ट्रेलिया चा इंग्लंडमधील पहिला विजय होता.