कोपर्डी येथील अल्पवयीन मुलीवर बलात्कार व खून खटल्यातील मुख्य आरोपी जितेंद्र शिंदे, दुसरा आरोपी संतोष भवाळ, तिसरा आरोपी नितीन भैलुमे यांना अहमदनगर जिल्हा सत्र न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली. ऑक्टोबर २०१६ पासून जिल्हा सत्र न्यायाधीश सुवर्णा केवले यांच्यासमोर या खटल्याचे कामकाज चालले. एक वर्ष व एक महिन्यानंतर या खटल्याचा अंतिम फैसला लागला आहे. १३ जुलै २०१६ रोजी सायंकाळी कोपर्डीत नववीत शिकणाऱ्या मुलीवर बलात्कार करुन खून करण्यात आला. तिच्या चुलतभावाने दिलेल्या फिर्यादीवरुन पोलिसांनी गुन्हा नोंदवला. पोलिसांनी जितेंद्र ऊर्फ पप्पू शिंदे याला अटक केली. नंतर संतोष भवाळ नितीन भैलुमे यांना अटक करण्यात अाली. या गुन्ह्यातील आरोपींना कठोर शिक्षा व्हावी, पीडित मुलीला न्याय मिळावा या मागणीसाठी राज्यभर मोर्चे निघाले. पोलिसांनी तीन महिन्यांत दोषारोपपत्र तयार करुन २० ऑक्टोबर २०१६ रोजी न्यायालयात दाखल केले. मुख्य आरोपी शिंदे याच्याविरुद्ध बलात्कार, खून पॉस्को कायद्यानव्ये दोषारोप ठेवण्यात आले. इतर दोन आरोपींविरुद्ध छेडछाड करणे संगमनताने कट रचण्याचे दोष ठेवण्यात अाले. सरकार पक्षातर्फे विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करण्यात आली. त्यांनी सरकार पक्षातर्फे पाच महिन्यांत ३१ साक्षीदार तपासले. मुख्य आरोपीच्या वतीने वकीलपत्र घेण्याचा ठराव नगरच्या वकील संघटनेने केला होता. त्यामुळे त्याची बाजू मांडण्यासाठी विधी सेवा प्राधिकरणाच्या वतीने ज्येष्ठ विधिज्ञ अॅड. योहान मकासरे यांची नियुक्ती करण्यात आली. दुसरा आरोपी संतोष भवाळ याच्या वतीने अॅड. बाळासाहेब खोपडे, त्यांची कन्या अॅड. विजयालक्ष्मी खोपडे यांनी काम पाहिले. तिसरा आरोपी नितीन भैलुमे याच्या वतीने अॅड. प्रकार आहेर यांनी काम पाहिले.
---Advertisement---
LATEST Post
Published On:
Published On: