कायदा व सुव्यवस्थेचे अपर पोलीस महासंचालक असलेले बिपीन बिहारी यांची राज्याच्या तुरुंग विभागाच्या महासंचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. पोलीस आस्थापना मंडळाने दिलेल्या शिफारशीवरून गृहमंत्रालयाकडून हे आदेश काढले आहेत. बिहारी हे १९८७ तुकडीतील आयपीएस अधिकारी आहेत. ते आता तुरुंग विभागाचे महासंचालक बनले आहेत. गेल्या महिन्यातच राज्य शासनाने हे पद निर्माण केले होते. यामुळे राज्य पोलीस दलामध्ये आता महासंचालक दर्जाची सात पदे झाली आहेत.
तुरुंग विभागाच्या महासंचालकपदी बिपीन बिहारी यांची नियुक्ती

Published On:
