गुजरात आणि हिमाचल प्रदेशमध्ये विजयानंतर भाजपचे आता देशातील १४ राज्यांत स्वत:चे मुख्यमंत्री असतील. ५ राज्यांत त्यांची आघाडी सरकारे आहेत. हिमाचल प्रदेशमध्ये भाजपने ६८ पैकी ४४ आणि गुजरातमध्ये १८२ पैकी ९९ जागा जिंकल्या आहेत.
उत्तराखंडमध्ये भाजपने ७० पैकी ५७ जागा जिंकल्या होत्या, राजस्थान मध्ये भाजपने २०० पैकी १६१ जागा जिंकल्या होत्या, उ. प्र.त भाजपने ४०३ पैकी ३११ जागा जिंकल्या आहेत. ज्या राज्यांत भाजपचे मुख्यमंत्री आहेत, त्यात गुजरात हे विधानसभा जागांच्या हिशेबाने पाचवे मोठे राज्य आहे. त्यापेक्षा जास्त विधानसभा जागा असणारी उ. प्र., महाराष्ट्र, मध्य प्रदेश, राजस्थान ही राज्ये आहेत. महाराष्ट्रात भाजपला २८८ पैकी १२२ जागा मिळाल्या होत्या, मध्य प्रदेशमध्ये भाजपने २३० पैकी १६५ जागा जिंकल्या, आसाममध्ये भाजपने १२८ पैकी ६१ जागा जिंकल्या, ज्या १४ राज्यांत भाजपचे मुख्यमंत्री आहेत, त्यापैकी ८ राज्यांत १०० पेक्षा कमी विधानसभा जागा आहेत. त्यात हरियाणा, छत्तीसगड, उत्तराखंड, अरुणाचल प्रदेश, हिमाचल प्रदेश, गोवा, मणिपूर ही राज्ये. सर्वात कमी ४० जागा गोव्यात आहेत. तेथे भाजपने १३ जागा जिंकल्या होत्या, मणिपूरमध्ये ६० विधासनभा जागा आहेत. तेथे भाजपचे ३१ आमदार आहेत, अरुणाचल प्रदेशमध्ये ६० विधानसभा जागा आहेत. तेथे भाजपकडे ४७ आमदार आहेत.