www.missionmpsc.com तर्फे गेल्या चार वर्षांपासून MPSC, राज्यसेवा, पोलीस भरती, एसटीआय, असिस्टंट यासह विविध शासकीय पातळीवर घेतल्या जाणार्या स्पर्धा परीक्षांचे मार्गदर्शन उपलब्ध करुन देण्यात येत होते. याकाळात missionmpsc या पोर्टलला भेट देणार्यांची संख्या सुमारे दोन कोटींपर्यंत पोहचली. फेसबुकवर ९६ हजारपेक्षा जास्त फॉलोअर्स, ट्विटरवर १८०० फॉलोअर्स, टेलीग्राम चॅनलला पाच हजाराच्यावर सबस्क्राइबर्स इतके भव्य यश केवळ आपल्या सगळ्यांच्या सहकार्यामुळेच मिळू शकले. आता विद्याथ्यार्ंंकडून प्राप्त सुचनांनुसार आम्ही युपीएससीसह बँकिंग व अन्य राष्ट्रीय पातळीवरील स्पर्धा परीक्षांची तयारी करण्यासाठी आम्ही आपली मदत करणार आहोत. यासाठी देशपातळीवर नामांकित असणार्या निओस्टेन्सिल व ग्रेड अप सारख्या संस्थांबरोबर आम्ही सहकार्य करार केला असून त्यांच्या मदतीने इंग्रजी भाषेतून करंट अपेअर्स, मार्गदर्शनपर आर्टीकल्स्, मॉक इंटरव्ह्यूव, सराव परीक्षा आदींची माहिती आपणापर्यंत पोहचविणार आहोत. चला तर मग देशपातळीवर घेतल्या जाणार्या कोणत्याही स्पर्धा परीक्षांची योग्य पध्दतीने तयारी सुरु करुया……!
भविष्यातील वाटचालीसाठी व नवीन वर्षांच्या आपणा सर्वांना शुभेच्छा… हे नवीन वर्ष आपणास स्पर्धा परीक्षांमध्ये भरघोस यश देणारे ठरो……
-टीम मिशन एमपीएससी