---Advertisement---

सलग सहाव्यांदा गुजरातमध्ये भाजप

By Saurabh Puranik

Updated On:

narendra_modi-rahul_gandhi
---Advertisement---

संपूर्ण देशाचे लक्ष लागलेल्या गुजरात विधानसभा निवडणुकीत भाजपने विजय मिळवला असून सलग सहाव्यांदा गुजरातमध्ये भाजप सत्ता स्थापन करणार आहे. काँग्रेसने ८० जागा जिंकत भाजपला कडवी झुंज दिली. त्यामुळेच गेल्या निवडणुकीत ११५ जागा जिंकणा-या भाजपचा विजयरथ यावेळी ९९ धावांवरच अडखळला. दरम्यान, हिमाचल प्रदेशात भाजपने जोरदार मुसंडी मारत ६८ पैकी ४४ जागांवर भाजपने मुसंडी मारली असून पाच वर्षानंतर पुन्हा हिमाचलची सत्ता हस्तगत करण्यात भाजपला यश मिळाले आहे. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपने मोदींच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढवत केंद्रात सत्ता स्थापन केली होती. त्यावेळी भाजपकडे ७ राज्यांची सत्ता होती. आता ही संख्या वाढून १९ झाली आहे, तर, काँग्रेसकडे १३ राज्ये होती. आता ती संख्या अवघ्या ४ वर आली आहे. जीएसटी, नोटाबंदीमुळे असलेली नाराजी, पटेल आरक्षणाचा पेटलेला मुद्दा, शेतक-यांचे प्रश्न यामुळे २२ वर्षापासून गुजरातमधील सत्तेवर असलेल्या भाजपाविरोधात सत्ताविरोधी वातावरण निर्माण झाले होते. त्यातच राहुल गांधींचा झंझावाती प्रचार, हार्दिक पटेल, जिग्नेश मेवाणी आणि अल्पेश ठाकोर यांनी सुरू केलेला झांझावाती प्राचार यामुळे गुजरातमध्ये भाजपाचा पराभव होणार की काय असे चित्र निर्माण झाले होते. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाध्यक्ष अमित शहा यांनी बिकट परिस्थितीत मोर्चा सांभाळत भाजपाला हरलेली बाजी जिंकून दिल्याचे दिसून आले.

Join WhatsApp Group

Join Now

Join Telegram Channel

Join Now