केंद्र आणि राज्यांमध्ये महसूल विभागणीच्या शिफारशींसाठी बुधवारी पंधरावा वित्त आयोग स्थापन करण्याचा केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत तत्त्वतः निर्णय घेण्यात आला. वित्त आयोगाच्या स्थापनेसंबंधातील नियम आणि अटींना अंतिम स्वरूप देऊन लवकरच अध्यक्ष आणि सदस्यांची नियुक्ती करण्यात येईल. पंधराव्या वित्त आयोगाच्या शिफारशींची अंमलबजावणी १ एप्रिल २०२० पासून ३१ मार्च २०२५ पर्यंत होईल. घटनेतील कलम २८० अंतर्गत दर पाच वर्षांनी वित्त आयोग स्थापन केला जातो.
---Advertisement---
LATEST Post
Published On:
Published On: